Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...
Saam TV September 20, 2024 05:45 PM
PM Narendra Modi Vardha Visit: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करणार आहे. कार्यक्रमासाठी पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी 2 हजार 250 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय.. यासंह या ठिकाणी तीन दिवसाचे विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दाखविणारे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले आहे . समारोहात 15 हजार विश्वकर्मा, 5 हजार आयटीआय प्रशिक्षनार्थी, 20 हजार महिला बचत गटाच्या महिला याशिवाय यवतमाळ आणि अमरावती येथून 5 हजार विश्वकर्मा उपस्थित राहणार आहे.

Lonavala News: आई एकविरा देवीच्या चरणी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांचे साकडं

लोणावळयातील आई एकविरा देवीच्या चरणी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांनी साकडं घातलं आहे. नवी मुंबईतील शेतकऱ्यांनी सिडको ला कवडीमोल भावात 40 वर्षांपूर्वी जमिनी दिल्या. मात्र आता या शेतकऱ्यांनी उरलेल्या थोड्या जागेत घर बांधल्यावर त्या घरांना अनधिकृत घोषित करण्यात आले. याबाबत निवृत्त आयएएस अधिकारी विजय नाहटा यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र तब्बल 40 वर्षांनंतर देखील नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त समस्याच्या विळख्यात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा व प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने निर्णय लागावा या मागणीसाठी नवी मुंबईतील सर्व प्रकल्प ग्रस्तांनी लोणावळयातील आई एकविरा चरणी साकडं घातले....

Aheri Assembly: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सेवा तुटपुंजी असल्याने नागरिकांना उपचाराकरिता तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव अशा दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात बरेच दुर्गम व अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. शिवाय लोकसंख्येच्या मानाने या दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या देखील कमी आहे. या दोन्ही तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता द्यावी, यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रयत्न केले.

मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महत्वाची बैठक

मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली महत्वाची बैठक

मंत्रालयात आज दुपारी ४ ते ५:३० वा दरम्यान या तीनही समाजा प्रलंबित विषयाचा आढावा या बैठकित घेतला जाणार

सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट यांसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा

छत्रपती संभाजी नगर ते पुणे मार्गाचे नूतनीकरण 9 हजार कोटीतून; शासनाचा अध्यादेश जारी.

छत्रपती संभाजी नगर ते पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने काल अध्यादेश जारी केला आहे.5 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे(MSIDC)हस्तांतरित करून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा देण्याचा देखील निर्णय आता शासनाने घेतलाय. त्यानुसार NH -753F असा या मार्गाचा क्रमांक असणार आहे. पुणे ते शिरूर हा 53 किलोमीटर चा मार्ग सहा पदरी होईल यासाठी 7515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर शिरूर अहमदनगर बाह्यवळण रस्त्या मार्गे छत्रपती संभाजी नगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासह सुमारे 9000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.

संजय पाण्डेय यांना भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आव्हान

संजय पाण्डेय यांना भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आव्हान

२०२२चा हिशेब २०२४मध्ये पूर्ण करू - कंबोज

पाण्डेय यांच्या काँग्रेस प्रवेशावर कंबोज यांचे आव्हान

याआधी कंबोज यांनी पाण्डेय यांना जेलमध्ये टाकण्याचे आव्हान दिले होते

पाण्डेय यांच्या जेलवारीनंतर कंबोज यांचे पुन्हा आव्हान

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.