Teacher Eligibility Test : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
esakal September 20, 2024 08:45 PM

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सूचना ‘http://mahatet.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे, असे राठोड यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.