Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी
Saam TV September 21, 2024 12:45 AM

भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी सांगलीतील ३२ शिराळा येथे एका भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या वक्तव्यावर आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'नितेश राणेंवर कठोर कारवाई करा'

आमदार सतीश चव्हाण म्हणाले आहेत की, ''भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक द्वेश वाढवणारी करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.''

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे.

यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. तसेच याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र असे असताना देखील ते पुन्हा तशाच पध्दतीची वक्तव्ये करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही सतीश चव्हाण आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने दखल घ्यावी

आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.