चिपळुणात स्वामी विवेकानंद जीवन चरित्रावर व्याख्यान
esakal September 21, 2024 01:45 AM

चिपळुणात स्वामी विवेकानंद
जीवन चरित्रावर व्याख्यान
चिपळूण, ता. २० ः उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून २३ ते २९ सप्टेंबर या कालावधीत स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक मंदार ओक यांचे विविध विषयांवर व्याख्यान होणार आहे.
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन शहरातील खेंड येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर (हवेली) करण्यात आले आहे. स्वामी जीवन चरित्राचे अभ्यासक ओक हे सात दिवसांच्या कालावधीत स्वामींच्या जीवन चरित्रावरील माहितीपर व्याख्यान देणार आहेत. त्यानुसार २३ ला स्वामी विवेकानंदांचे बालपण व महाविद्यालयीन जीवन, २४ ला रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद (गुरू-शिष्य नात्याची जडणघडण), २५ ला परिव्राजक विवेकानंद (भारत भ्रमणातील अनुभव), २६ ला सर्वधर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद, २७ ला स्वामीजींचे पाश्चिमात्त्य शिष्य आणि पश्चिमेतील कार्य, २८ ला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे उत्तराधिकारी, २९ ला महासमाधी आदी स्वामींच्या जीवन चरित्रावर व्याख्यान होणार असून, सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत खंड हवेली येथे ही व्याख्याने होणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.