मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार होती.
Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन विद्यापीठानं परिपत्रकात काय म्हटलंय?या निवडणुकीसंदर्भात मुंबई विद्यापीठानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कमल २८(२)(न) प्रमाणं नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणुकीची निवडणूक अधिसूचना ३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेत नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती.
Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहितीया निवडणुकीच्या अनुषंगानं संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कळवण्यात येतं की, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, २२ सप्टेंबर रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला. एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २ दिवसांवर असताना स्थागित करण्यात आली. निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील. अशा घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावसं वाटतं की, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही. सूर्योदय होणार म्हणजे होणारच!