Healthy Burger Recipe: हा बर्गर खाऊन वजन करा कमी, डाएटीशियनने सांगितली रेसिपी
Times Now Marathi November 11, 2024 02:45 AM

Healthy : आजकाल खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मोठ्या प्रमाणात लोकं लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. ज्यापैकी अनेकजण पिझ्झा, बर्गर खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत, जे त्याची लालसा अजिबात नियंत्रित करू शकत नाही. जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल, तर आहारतज्ञ नीतू गोयल यांनी एक जबरदस्त तोडगा काढला आहे. त्यांनी सोशल मिडियावर वजन कमी करणाऱ्या बर्गरची रेसिपी शेअर केली आहे. हे बर्गर खाऊन तुम्ही तुमचे वजन देखील कमी करू शकतात.

या रेसिपीच्या मदतीने तुम्ही तुमची खाण्याची लालसा देखील भागवू शकता, शिवाय हा बर्गर तुम्ही घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या या हेल्दी बर्गरची रेसिपी.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हा बर्गर

आज आम्ही तुम्हाला फलाफेल बर्गर या आरोग्यदायी बर्गरची रेसिपी सांगणार आहोत, हा बर्गर खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे पोट आणि हृदयासाठी खूप चांगले मानले जाते. हा बर्गर बनवणे खूप सोपे आहे. यामध्ये वजन वढीस कारणीभूत ठरणाऱ्या बटाट्याचा वापर केलेला नाही. या बर्गरमधील टिक्की बेसनचा वापर करून बनवली जाते.

पहा हा व्हिडिओ



साहित्य
कुस्करलेली चणा डाळ
चिरलेला कांदा
बेसन
काळी मिरी
ठेचलेले लसूण
दही


कृती
- यासाठी सर्वप्रथम हरभरे चांगले उकडून घ्या, त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या
- मग यात चिरलेला कांदा, मीठ, काळी मिरी आणि किसलेल्या लसूण पाकळ्या, आणि थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- त्यानंतर हे सर्व मिश्रण बाहेर काढून त्याला टिक्की सारखा आकार द्या, आणि त्याला एअर फ्राय करा.अशाप्रकारे बर्गरची टिक्की तयार होते.
- त्यानंतर तळाचा बन घ्या. त्यावर तुमच्या आवडीची भाजी ठेवा. यानंतर त्यावर टिक्की ठेवा आणि कांदा रिंगच्या आकारात कापून वरती लावा. - यानंतर त्यावर दही लावून दुसऱ्या बनने ते झाका. अशा प्रकारे तुमचा हेल्दी बर्गर तयार होतो.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.