संत्र्याचा ज्यूस घेण्यासाठी एक महिला दुकानात पोहोचली, पण पुढच्या क्षणी आपले नशीब चमकणार आहे, याची तिला कल्पना नव्हती. ज्यूस खरेदी करून ही महिला करोडपती झाली होती. साहजिकच ज्यूस विकत घेऊन कोणी करोडपती कसा बनू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काय प्रकरण आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या केली स्पारची ही कहाणी आहे, जिने एका छोट्या घटनेने तिचे आयुष्य कसे बदलून टाकले हे सांगितले. नशीब असे बदलले की तिचे जग बदलले आणि एका झटक्यात ती करोडपती झाली.
UPI रिपोर्टनुसार, केर्नर्सविलेच्या केलीने सांगितले की, ती पाइन ग्रोव्ह रोडवरील क्वालिटी मार्टमध्ये ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी गेली होती, जिथे ती भाग्यवान ठरली. ती म्हणाली, मी आयुष्यात कधीही लॉटरीचे तिकीट घेतले नव्हते. त्या दिवशी ती लॉटरी काउंटरकडे आकर्षित झाली, तेव्हा मी काय विचार करत होते, ते मला माहित नाही. यानंतर, मल्टीप्लायर स्क्रॅच ऑफ तिकीट $20 मध्ये खरेदी केले गेले आणि $2,50,000 (अंदाजे रु 2 कोटी) चा जॅकपॉट लागला.
आपण जॅकपॉट जिंकला, यावर केलीचा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा स्टोअर मॅनेजरने तिला सांगितले की ती खरोखरच करोडपती झाली आहे, तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागली. ती म्हणाली, या विजयाने माझे आयुष्य बदलले. या रकमेमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याआधी, चीनमध्ये देखील असेच किस्मत कनेक्शन घडले होते, जेव्हा एका व्यक्तीने अनिच्छेने $30 किमतीचे लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि त्याने ते स्क्रॅच करताच, त्याने जॅकपॉट जिंकल्यामुळे आनंदाने उडी मारली. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले होते की, त्याने यापूर्वी इतके शून्य पाहिले नव्हते.