Nitesh Rane : भाजपा आणि शिंदेंच्या जाहीराती सामनामध्ये कशा चालतात? नितेश राणेंचा सवाल
GH News November 14, 2024 02:13 PM

“भाजपा आणि शिंदे यांच्या जाहिराती समानामध्ये का चालतात? भाजपा आणि नेत्यांच्या जाहिरातीवर आक्षेप असेल तर छापू नका. महायुतीचा पैसा चालतो, केवळ सकाळी उठून खडी फोडायची, अशा डबलढोलकी पणाला जनता चांगली ओळखते” अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचा समाचार घेतला. “गौतम अदानी जर एवढे खटकत असतील, तर त्यांचं विमान कस चालतं? लपून छपून कोण भेटतं? ह्याची माहिती आम्ही द्यायची का?” असा इशारा नितेश राणे यांनी दिला. “गौतम अदानींसोबत बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करायची हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे” असं नितेश राणे म्हणाले.

“उद्धव ठाकरे घराणेशाहीबद्दल बोलले, पण स्टेजवरच त्यांनी थोडं मागे वळून पाहिलं असतना, तर त्यांना घराणेशाही दिसली असती. घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. काल लोक त्यांना हसत होते, उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीवर phd केली आहे. उद्धव ठाकरेंची टेप रेकॉर्डर जुनी झाली आहे, लोक आता त्याला कंटाळली आहेत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

‘उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते?’

“कालच्या प्रचार सभेत एक तरी विकासाचा मुद्धा आला का?. एक तरी विकासाचा मुद्धा कालच्या भाषणात दाखवा, मी त्यांना बक्षीस देतो. दरोडेखोर कोण आहेत ते चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. 23 तारखेनंतर तुम्ही बेरोजगार होणार. पुतळा तयार झाला की फोटोग्राफीची ऑर्डर तुम्हाला देणार” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “बागायतदारांसाठी असंख्या योजना आहेत ते उद्धव ठाकरेंना दिसत नाही. उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते?. उद्धव ठाकरे तेव्हा कॅमेरा साफ करत होते, त्यामुळे बाळासाहेब आणि भाजपा ह्यांचे संबंध समजणार नाहीत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.