विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होईल? याची सध्या चर्चा होतेय पण विनोद तावडे यांनी याबाबत नवीन दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विनोद तावडे म्हणाले की राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून नवीन चेह-याचे नाव पुढे येऊ शकते. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये जसं चर्चेत नसलेले नेते मुख्यमंत्री बनले तसं महाराष्ट्रातही होऊ शकते.
जर निकालानंतर भाजपा हा मोठा पक्ष म्हणून जर पुढे आला, तर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर आल्याचे पाहायला मिळू शकते, असे संकेत अमित शहा यांनी नुकतेच अनेक प्रचारसभांतून दिले होते. पण आता विनोद तावडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात नवा चेहरा कोण याची चर्चा सुरु झाली आहे.
( बातमी अपडेट होत आहे)