झारखंड विधानसभा निवडणूक: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील ४३ जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 2.60 कोटी मतदारांपैकी 1.37 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
यावेळी झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यासाठी 43 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. निवडणुकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सीसीटीव्ही नियंत्रण बसविण्यात आले आहे. मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची मोठी जबाबदारी आहे.
वायनाडमध्ये प्रियंका गांधींची लिटमस टेस्ट
केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागेवरून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधींनी जागा सोडल्यानंतर ही जागा रिक्त झाली. आता त्यांची बहीण प्रियांका गांधी वढेरा या जागेवरून नशीब आजमावत आहेत. राज्यात काँग्रेसची यूडीएफसोबत युती आहे. भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली असून डाव्या आघाडीने एलडीएफने सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे.