Pune truck inside road news
Marathi September 21, 2024 05:24 AM


पुणे- पुण्यातील सिटी पोस्ट परिसरात असलेल्या समाधान चौकात एक ट्रक अचानक खड्ड्यात पडला. या घटनेमुळे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने, यात कोणतीही जिवीत हानी किंवा दुखापत झाली नाही, परंतु अधिकारी ट्रक खड्ड्यात कसा पडला आणि झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत आहेत. दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. यामध्ये हा ट्रक समाधान चौकामध्ये उभा असल्याचं दिसून येतय. तर यात हा ट्रक पुणे महानगरपालिकेचा असल्याचं देखील दिसून येतयं. त्यानंतर ट्रकचालक हा ट्रकमध्ये चढते आणि ट्रकला अगदी चार पाउलांचा अंतरावर पुढे नेलं की तोच ट्रक मागच्या बाजूने रसत्याचा आत गेल्याच दृश्य या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येतय. हा ट्रक आत जातानाच चालकाने ताबडतोब बाहेर उडी मारली.

हेही वाचा

– Advertisement –

स्थानिक रहिवाशांनी परिसराच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्वरित दुरुस्तीची मागणी केली.

– Advertisement –

Edited By: SAKSHI.S.BASUTKAR



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.