Congress officials in Nanded oppose the entry of former minister Bhaskarrao Khatgaonkar PPK
Marathi September 21, 2024 08:25 AM


शुक्रवारी (ता. 20 सप्टेंबर) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात खतगावकर आणि त्यांच्या सून मीनल खतगावकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. परंतु, खतगावकर यांच्या प्रवेशामुळे नांदेडमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई : भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय, माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खतगावकर यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. शुक्रवारी (ता. 20 सप्टेंबर) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात खतगावकर आणि त्यांच्या सून मीनल खतगावकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. परंतु, भास्करराव खतगावकर यांच्या प्रवेशामुळे नांदेडमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड काँग्रेसचे कार्याध्यक्ष जे. पी. पाटील यांनी माय महानगरच्या प्रतिनिधीकडे नाराजी व्यक्त केली आहे. (Congress officials in Nanded oppose the entry of former minister Bhaskarrao Khatgaonkar)

भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या भास्करराव खतगावकर यांच्या प्रवेशाआधी नांदेडमधील काँग्रेसच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर माय महानगरच्या प्रतिनिधीने नांदेड कार्याध्यक्ष जे. पी. पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, संपूर्ण नांदेड जिल्हा भास्करराव खतगावकर यांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात आहे. नांदेडमधील जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे, पण खतगावकर यांच्या पाठीशी नाही. तसेच, अशोक चव्हाण यांनी भाजपाची काँग्रेसमध्ये भाजपाची बी टीम तयार करण्याकरिता खतगावकर आणि त्यांच्या सूनेला तसेच माजी आमदार अविनाश घाटे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यास सांगितल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तसेच, भास्करराव खतगावकर यांच्या प्रवेशामुळे पक्षाला धोका असून नांदेडमधील पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण निवडून येणार नाहीत. यासाठी भास्करराव खतगावकरच जबाबदार असतील. खतगावकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षापासून दूर जातील. त्यांची हुकूमशाही आम्हाला मान्य नाही. नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते भास्करराव खतगावकर यांच्यावर नाराज आहेत, असे कार्याध्यक्ष जे. पी. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पण “माझ्या पक्षप्रवेशाला विरोध करणारे खरे काँग्रेसमधील नाहीत”, असा पलटवार माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांनी केला आहे. ज्यामुळे आता खतगावकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.