परी म्हणून की सुंदरा... ऐश्वर्या रायचं जुनं फोटोशूट व्हायरल, अभिनेत्रीच्या डोळ्यांत जणू सामावलंय विश्व
नामदेव जगताप September 21, 2024 10:43 AM

Aishwarya Rai Bachchan Old Photoshoot : मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्या आजही अनेकांचं पहिलं प्रेम आहे. ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात मिस वर्ल्डचा किताब जिंकून देशाची शान वाढवली होती. आजही ऐश्वर्याचं सौंदर्य तिळभरही कमी झालेलं नाही. ऐश्वर्या रायचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं जुने फोटोशूट व्हायरल होत आहे. 29 वर्षांपूर्वीच्या या व्हायरल फोटोशूटवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ऐश्वर्याच्या फोटोंवरुन नजर हटवणं फार कठीण झालं आहे.

ऐश्वर्या रायचं 29 वर्षांपूर्वीचं फोटोशूट व्हायरल

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने 1997 मध्ये तमिळ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. 1997 मध्ये आलेल्या 'इरुवर' हा तमिळ चित्रपट ऐश्वर्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर 'और प्यार हो गया से' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश केला. अडीच दशकांच्या कारकिर्दीत ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चर्चेत

ऐश्वर्या राय ही मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून आहे. अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतरही ऐश्वर्या राय चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नमच्या 'पोनियिन सेलवन 2' चित्रपटामध्ये दिसली होती. यातील ऐश्वर्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. या चित्रपटासाठी ऐश्वर्या रायला SIIMA (साउथ फिल्म इंडस्ट्री अवॉर्ड्स) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 

ऐश्वर्या रायच्या चेहऱ्यावर खिळल्या नजरा

आता, ऐश्वर्याच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ऐश्वर्याचा हा फोटो सुमारे तीन दशकं जुना आहे. पण, यातील तिचं सौंदर्य डोळे विस्फारणारं आहे. तिचा चेहरा विशेषत: तिच्या डोळ्यांवरुन नजर हटवणं सर्वांनाच फार कठीण आहे.

ऐश्वर्या रायच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

रेडिटवर ऐश्वर्या रायच्या व्हायरल झालेल्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, ऐश्वर्या सौंदर्याचं प्रतिक आहे. एका यूजरने लिहिलं की, मला ऐश्वर्या कधीच आवडली नाही, पण हा फोटो पाहिल्यानंतर माझं मत बदललं आहे. ऐश्वर्या  राय सध्या तिच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. पण, अभिषेकने घटस्फोटाचा दावा फेटाळला आहे.

Squid Game-Luck Contro : स्क्विड गेमवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप, तुंबाड' फेम सोहम शाहकडून खटला दाखल

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.