Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?
Saam TV September 21, 2024 01:45 PM

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) च्या घरात रोज एक नवा वाद आणि राडा पाहायला मिळतो. प्रत्येकजण आता आपल गेम प्लान खेळून बिग बॉसचा खेळ जिंकण्याच्या तयारीत आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला यात अरबाजने बाजी मारली आहे. 'कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?' या कॅप्टन्सी टास्कमध्ये रंजक असा निक्की आणि अरबाजचा सामना पाहायला मिळाला.

या आठवड्याचा कॅप्टन अरबाज ( Arbaz Patel) झाला आहे. त्याला हा मान दोन वेळा मिळाला आहे. या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी अरबाज, सूरज, वर्षा आणि धनंजय असे चार उमेदवार होते. या टास्कमध्ये स्पर्धकांना पाण्याची एक टाकी दिली असून इतर स्पर्धकांना त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचे होते. कॅप्टन्सीच्या शर्यतीत नसलेल्या स्पर्धकांपैकी जो सर्वात आधी बझर वाजवेल, त्याच्याकडे उमेदवाराकडील पाण्याचा दर निश्चित करण्याचा अधिकार असेल. टास्कच्या शेवटच्या फेरीत ज्याच्याकडे सर्वाधिक बीबी करन्सी असते तो विजयी होतो. म्हणजे कॅप्टन बनतो.

या टास्कमध्ये निक्कीचा (Nikki Tamboli) गेम महत्त्वाची भूमिका बजावतो. निक्की पहिल्या डावातच बझर वाजवून एका ग्लासची किंमत पाचशे रुपये सांगते. तर बाकीच्या तिघांच्या पाण्याच्या ग्लासची किंमत३००, २०० , १०० रुपये एवढी ठेवते. दुसऱ्या डावात निक्की पुन्हा बझर वाजवून ग्लासची किंमत ३०० ठेवते. यामुळे अरबाज ४००० करन्सी मिळवून जिंकतो.

दुसऱ्या फेरीत धनंजय खेळातून बाद झाला. शेवटची फेरी अरबाज आणि वर्षा ताईंन मध्ये होते. पण शेवटच्या फेरीत वर्षा ताईंचा पराभव होतो आणि बहुमताने अरबाजचा विजय होतो. निक्कीच्या जबरदस्त गेममुळे अरबाज पुन्हा कॅप्टन होतो. याचा निक्कीला देखील आनंद होतो. आता अरबाज कॅप्टन्सी कशी निभावणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.