Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीप्रकरणी 30 जणांना अटक; इमामनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
esakal September 21, 2024 02:45 PM

या घटनेप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक केली आहे, अशी माहिती राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हितेंद्र यांनी दिली.

बंगळूर : दावणगेरे येथील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan Procession) झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील ३० जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे दावणगेरे शहरातील बेतुरू रोडवरील व्यंकोबोवी कॉलनीत तणाव आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून दारूबंदी आदेश लागू केला आहे. इमामनगर येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

स्थानिक पोलिसांबरोबरच (Police) हावेरी आणि शिमोगा जिल्ह्यांतील राखीव पोलिसांच्या तुकड्याही घटनास्थळी तळ ठोकून आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख उमा यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. येथील प्रार्थनास्थळाजवळ दहाहून अधिक पोलिसांची वाहने तैनात केली असून, कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गुरुवारी संध्याकाळी बेतूर रस्त्यावरील गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली.

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

शहरातील अरलीमारा सर्कलजवळ दगडफेक सुरू झाली. नंतर केआर रोड, हमसाबावी सर्कल, केआर मार्केट, बंबू बाजार रोड आणि मट्टीकल्लू परिसरातही दगडफेक झाली. पोलिस मोठ्या संख्येने आल्यावर दंगलखोर तेथून पळून गेले आणि त्यांनी परिसरात गोंधळ घातला. त्यांनी मट्टीकल्लू आणि अनेकोंडा भागातील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली. सुमारे ६० ते ७० तरुणांच्या टोळक्याने अनेक ठिकाणी दगडफेक करून घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले.

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम Davangere Ganpati Visarjan Procession

घटनेप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक केली आहे, अशी माहिती राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हितेंद्र यांनी दिली. बेतुरातील घटनेत दोन पोलिस जखमी झाले आहेत. यावेळी मट्टीकल्लू परिसरात समाजकंटकांचा एक गट घुसला. पोलिसांनी तातडीने सक्रिय होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिस उपाधीक्षक कल्लेश दोड्डामनी यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दोन गटांतील एकूण १८ आरोपींना न्यायाधीश प्रशांत यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी १८ पैकी १० आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.