NIA ची बिहारमध्ये मोठी कारवाई
Marathi September 21, 2024 05:24 AM

संजद नेत्याच्या घरावर छापे

पाटणा : एनआयएने प्रतिबंधित संघटना भाकप (माओवादी)च्या कार्यकर्त्यांसोबत अवैध कारवायांमध्ये कथित सहभागावरून बिहार विधान परिषदेच्या माजी सदस्यासमवेत दोन जणांच्या ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले आहेत. गया जिल्ह्यातील रामपूर येथे माजी आमदार मनोरमा देवी आणि गोइंथा गावात द्वारिका यादव यांच्या ठिकाणांवर एनआयएने झडती घेतली आहे. बिहारच्या मगध क्षेत्रात प्रतिबंधित संघटनेला पुन्हा सक्रीय करण्याच्या भाकपच्या (माओवादी)  कटाच्या संदर्भात एनआयएने चालविलेल्या तपासाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 2023 मध्ये रोहित राय आणि प्रमोद यादव या आरोपींकडून शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा हस्तगत करण्यात आला होता. दोघेही भाकप (माओवादी)च्या हिंसक कारवायांना बळ देण्यासाठी ठेकेदार तसेच विटभट्टी मालकांकडून खंडणी वसूल करत होते. मनोरमा देवी यांच्याशी काही जणांना एनआयएने यापूर्वीच अटक केली होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.