Indian-American CEO Exposes Poor Air India Business Class Experience KP
Marathi September 21, 2024 12:24 PM


सर्वात वाईट अनुभव असे म्हणत, अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ अनिप पटेल यांनी सोशल मिडियाद्वारे पोस्ट करत एअर इंडियाची पोलखोल केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये फ्लाइटमधील अस्वच्छता आणि कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नाही, असे नमूद केले आहे.

मुंबई : सर्वात वाईट अनुभव असे म्हणत, अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ अनिप पटेल यांनी सोशल मिडियाद्वारे पोस्ट करत एअर इंडियाची पोलखोल केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये फ्लाइटमधील अस्वच्छता आणि कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाने त्यांची कोणतीही तक्रार न नोंदवता त्यांना परतावा दिला आहे. (Indian-American CEO Exposes Poor Air India Business Class Experience.)

हेही वाचा : Youtube Channel Hack : क्रिप्टोकरन्सीशी संबंधित लाइव्ह व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाच्या चॅनेलवर

– Advertisement –

कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे सीईओ अनिप पटेल यांनी काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या विमानाने बिझनेस क्लासमधून प्रवास केला. त्यावेळी त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना आलेला अत्यंत वाईट प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विमानातील अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाच्या सेवेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर हा प्रवास म्हणजे एखादे वाईट स्वप्न असल्याचे देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर एअर इंडियाने कोणतीही तक्रार न नोंदवता त्यांना त्यांचा परतावा दिला आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi : काँग्रेसला गणपती पूजेची चीड, अखेर पंतप्रधान मोदींनी दिले प्रत्युत्तर

– Advertisement –

अलीकडेच एअर इंडियाच्या एका फ्लाइटमधून बिझनेस क्लासच्या तिकिटावर शिकागो ते दिल्ली असा 15 तासांचा नॉन-स्टॉप प्रवास त्यांनी केला होता. या प्रवासादरम्यान त्यांना खूपच वाईट अनुभव आल्याचे त्यांनी शेअर केले आहे. त्या दिवशी बिझनेस क्लासमधील अनुभव माझा सर्वात वाईट अनुभव असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले आहे. तसेच ते म्हणाले, माझा प्रवासाचा अनुभव अजिबात आनंददायी नव्हता. मी एअर इंडियाबद्दल खूप नकारात्मक गोष्टी ऐकल्या होत्या, पण मला वाटले की, नवीन व्यवस्थापनानंतर त्यात सुधारणा झाली असेल, मात्र दुर्दैवाने तसे काहीही झाले नाही. तसेच त्या फ्लाइटमध्ये वाय-फाय देखील नव्हते. फर्स्ट क्लासची अवस्था देखील फार वाईट होती. केबिनमध्ये सर्व ठिकाणी अन्न आणि कचरा पडलेला होता. संपूर्ण प्रवासाचा अनुभव खूपच वाईट होता. एअर इंडियाची सेवा घेण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी सांगितले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.