मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
शिवानी पांढरे September 21, 2024 03:13 PM

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) प्रकृती बरी नाही त्यामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार होते, मात्र शिंदेंचा दौरा रद्द झाला आहे. 

पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे हा कार्यक्रम पार पडणार नाही. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून नाम फाउंडेशन ही सामाजिक संस्था २०१५ स्थापन केली होती. संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.