Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला
Saam TV September 21, 2024 05:45 PM
Pandharpur News: धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

सकल धनगर बांधवांनी सुरू केला रास्ता रोको..

पुणे - इंदूर महामार्ग धरला रोखून ...

मेंढ्या घेऊन मेंढपाळ रास्ता रोकोमध्ये सहभाग ...

एस.टी.प्रवर्गात सहभाग करण्याची आग्रही मागणी...

रास्ता रोको मुळे दुतर्फा वाहतूक ठप्प...

शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

Pune News: अभिनेते शरद पोक्षेंची राहुल गांधींवर टीका

स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्नच्या पुढे गेलेले आहेत. मात्र सावरकरांना भारतरत्न द्यावा असं कार्यकर्त्यांची मागणी आहे. देऊ शकले तर पंतप्रधान मोदीच देऊ शकतात कारण बाकी समोरचे जे आहे ते माफी वीर म्हणून बोंबलत असतात अशी प्रतिक्रिया शरद पोंक्षे यांनी दिली आहे. पुण्यातील बालगंधर्व मध्ये त्यांचं आज मधुकर मुसळे यांनी व्याख्यान आयोजित केला आहे. आता जे काही आहेत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असतात सारखं माफी वीर माफी वीर म्हणून बोलत असतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा टोला शरद पक्ष यांनी राहुल गांधी यांना लगावला.

Beed News : बंदची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू, मराठा बांधवांचा इशारा

बीडमध्ये आज मराठा बांधवांनी बंद पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आणि पाठिंबा दर्शवत, मराठा समाज बांधवांनी आज बीड बंदची दिली आहे. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जरांगे पाटलांना सहाव्यांदा उपोषण करावा लागतेय. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र तरी देखील सरकार उपोषणाची दखल घेत नाही. उलट आमचा आवाज दाबण्याचा पोलीस प्रशासनाने जवळपास 500 मराठा बांधवांना नोटीस दिल्या आहेत..त्यामुळं आमचं एकच सांगणं आहे, आज हा बंद शांततेत आहे, जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटतील, महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे

Nashik News : महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा वाद चिघळण्याची चिन्हं

नाशिकमद्ये महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. कारण, शरद पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० जागांवर दावा केला आहे. अजित पवार गटात गेलेल्या ६ विद्यमान आमदारांच्या ६ जागांसह ग्रामीण भागातील २ आणि शहरातील २ जागांसाठी शरद पवार गटआग्रही आहे.

निफाड, येवला, दिंडोरी, देवळाली, सिन्नर, कळवणसह चांदवड, मालेगाव मध्य आणि शहरातील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य अथवा नाशिक पूर्व अशा १० जागांसाठी शरद पवार गटाने आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यच्या जागेवर याआधीच उद्धव ठाकरे गटाने दावा करत प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल त्यांची प्रकृती खालवल्याने अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल होत आहे.

मनोज जरंगे पाटील यांची चौथ्या दिवशी प्रकृती खालवल्याने शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यावर डॉक्टरांनी सलाईनद्वारे उपचार केले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसापासून माध्यमांशी संवाद साधला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी काय संवाद साधतात आणि काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे...

Ahmednagar News : कोपरगाव दुय्यम कारागृहात कैद्यांचा राडा; पोलिसाला केली मारहाण

कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांमध्ये आपापसात राडा झाला. हा राडा सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. किरण अर्जुन आजवे आणि मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड अशी कारागृहात राडा करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Beed News : बीड शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट; दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी बीडमध्ये सुरु असलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.दुकानदार अन व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन, उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.. त्याचबरोबर बीड शहरातील इंग्लिश स्कूल देखील बंद करण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation : वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे येत होते. यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असलेल्या वडीगोद्री फाट्यावर पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणार रस्ता बंद केल्याने पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

त्यानंतर मराठा आंदोलकाच्या गाड्या का सोडता असे म्हणत ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याने थोडावेळ वडीगोद्री फाट्यावर तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केलाय.

ज्या पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं होतं त्यांच्या निलंबनाची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. दरम्यान काल रात्री मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आलेल्या ठिकाणी आता शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.