Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती
esakal September 21, 2024 05:45 PM
Dharavi Live: धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बीएमसीच्या पथकाच्या गाडीची तोडफोड झाली आहे. दगडफेक देखील झाल्याची माहिती आहे.

NAAM Foundation Live: अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिवस

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिवस आहे. पुण्यातील गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे नवव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ⁠मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गुजरातचे सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन कार्यक्रम होणार आहे. नाम फाऊंडेशन कडून राज्यभरात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.

sharad ponkshe Live : शरद पोंक्षे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

शरद पोंक्षे यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतरत्न दिला तर भाजप सरकारचं देवू शकतं. आता जे काही आहेत परदेशात जाऊन बदनामी करत असतात .सारखं माफीवीर माफीवीर म्हणून बोलत असतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. मात्र भारतरत्न पुरस्काराच्या पलिकडे सावरकर आहेत. मी आता त्या पलीकडे गेलो आहे, असं ते म्हणाले.

Mahayuti Meeting Live: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील तीन ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून स्टॅडिग उमेदवारांना पहिला, तर शिवसेनेने लढवलेल्या जागांना दुसरा प्रेफरन्स देण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला ठेवलेल्या शिवसेनेला कमीत कमी १०० तर जास्तीत जास्त १२१ जागा हव्यात. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीतील नेत्यांचा मानस आहे. लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही. शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे नेतेच ठरवतील....यात भाजप नेत्यांचा हस्तक्षेप नसणार अशी सूत्रांची माहिती आहे.

Pune Railway Cancel LIVE : पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना बसणार फटका

पुणे : दौंड ते मनमाड सेक्शन दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

CM Eknath Shinde LIVE : जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी चालवला ट्रॅक्टर

मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅक्टर चालवला. या कार्यक्रमाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते.

Tulsi Dam LIVE : तुळशी धरणाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

धामोड : येथील तुळशी धरणाच्या पायथ्याशी मृतदेहाचा सांगाडा सापडला. कृष्णात शिवाजी मांढरेकर (वय ४६, रा. कांबळवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या महिन्यापासून ते घरातून बेपत्ता होते. याबाबतची वर्दी दिगंबर दिनकर दळवी यांनी राधानगरी पोलिसांत दिली. काल सकाळी ११ वाजता त्यांच्या मृतदेहाचा सांगाडा जनावरे चारण्यासाठी गेलेल्या दिगंबर तामकर यांना दिसला. याबाबतची माहिती त्यांनी राधानगरी पोलिसांना दिली. कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील भाचा दिगंबर दिनकर दळवी यांनी ओळखला.

Sri Lanka Election 2024 : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

कोलंबो : श्रीलंकेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीये. 2022 मधील सर्वात वाईट आर्थिक मंदीनंतर श्रीलंका सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत.

BJP leader LIVE : भाजपच्या तीन नेत्यांना डीपीडीसीमधून निधी मंजूर

भाजपच्या तीन नेत्यांना डीपीडीसीमधून निधी मंजूर झाला आहे. हर्षवर्धन पाटील, आशा बुचके आणि बाळा भेगडे यांना १ कोटी रुपये निधी मंजूर झाला. आशा बुचके यांनी तर थेट अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते. मात्र, हे तीन बंडखोरी करणार की काय? अशी चर्चा असतानाच डीपीडीसीतून निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे. तर, कांग्रेसच्या दोन आमदार आणि शरद पवार गटाच्या एका आमदाराला निधी वाटपातून वगळलं असल्याची चर्चा आहे

PM नरेंद्र मोदींचा आजपासून तीन दिवसीय United States दौरा

PM नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय United States दौरा आजपासून सुरू होत आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या QUAD लीडर्स समिट आणि समिट ऑफ द फ्युचर (SOTF) मध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात अपघात, मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात (Khambatki Ghat Accident) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू वरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडविले. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इथे क्लिक करा

Kolkata Doctor Case LIVE : निवासी डॉक्टरांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन मागे

कोलकता : पश्चिम बंगालमधील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन काल संध्याकाळी मागे घेतले. आजपासून (ता. २१) अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे या निवासी डॉक्टरांनी सांगितले.

Delhi CM LIVE : केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी आज घेणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आतिशी यांच्यासोबत ५ आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेतील. गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आतिशी यांच्यासोबत हे सर्व मंत्री आज सायंकाळी ४.३० वाजता पदाची शपथ घेतील.

Governor C. P. Radhakrishnan LIVE : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर

Latest Marathi Live Updates 21 September 2024 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता.२५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते त्या दिवशी शासकीय विश्रामगृह येथे दिवसभर विविध घटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तर, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच यंदाच्या म्हैसूर दसऱ्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ‘हंपना’ तथा एच. पी. नागराजय्या यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पंजाबमधील चार ठिकाणांवर छापे टाकले. तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याप्रकरणी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडून माहिती मागविलीये. मध्यवर्ती काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघाजणांचा मृत्यू झाला असून अन्य ३२ जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.