'भोर'मधील रस्त्यांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर
esakal September 22, 2024 05:45 AM

भोर, ता. २१ : भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड (वेल्हे) आणि मुळशी तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २८ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. यामध्ये भोर तालुक्यातील रस्त्याच्या एका कामासाठी ५ कोटी ६२ लाख, राजगड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी १० कोटी ९३ लाख आणि मुळशी तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ११ कोटी ७६ लाख रुपयांचा समावेश आहे.
तालुकानिहाय मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे- भोर तालुका- कुसगाव- खोपी- कांजळे- साळवडे ते वरवे बुद्रुक पुलाचे बांधकाम करणे ५ कोटी ६२ लाख, राजगड तालुका- केळद ते निगडे कुंभे ५.५ किलोमीटर रस्ता करणे ५ कोटी ७८ लाख व घोल ते रायगड जिल्हा हद्द ३.८२ किलोमीटर रस्ता करणे ५ कोटी १५ लाख). मुळशी तालुका - पिंपळोली ते पाचाणे ४.८ किलोमीटर रस्ता करणे, ६ कोटी ६४ लाख रुपये व भांबर्डे ते बार्पे- सालतर रस्ता ५.५ किलोमीटर करणे ५ कोटी १२ लाख रुपये.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.