जिल्हास्तरीय कॅरममध्ये ६७६ विद्यार्थ्यांचा सहभाग
esakal September 22, 2024 06:45 AM

आळेफाटा, ता. २१ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी (ता. जुन्नर) यांच्यावतीने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ६७६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जुन्नर तालुका शिक्षक क्रीडा संघटनेचे सदस्यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी राजुरी येथील विद्यालयाचे प्राचार्य जी.के. औटी, पर्यवेक्षक सुनिल पवार, किरण औटी, मंगेश डुंबरे, प्रकाश जोंधळे, अशोक राहींज, किशोर कडलाक यांसह दहावीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करीअर करून आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे नाव मोठे कसे होईल याकडे लक्ष द्यावे. आताची मुले मोबाईलमुळे कबड्डी, खो-खो, आट्या-पाट्या, विट्टू-दांडू अशा मैदानी खेळांकडे दुलर्क्ष करू लागली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारिरिक आरोग्यावर होत आहे, त्यामुळे पालकांनी मुलांना मैदानी खेळांची सवय लावण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसरपंच माऊली शेळके, उद्योजक पंकज कणसे, वल्लभ शेळके, ज्ञानेश्वर गटकळ, शाकीर राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, शाकीर चौगुले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष संदीप औटी, गणेश हाडवळे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, उपाध्यक्ष संतोष गोपाळे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल :
१४ वर्षे वयोगट (मुले) : साहील तोडकर, गणेश शिंदे, करण वाबळे, प्रेम भुमकर, वेदांत वाबळे, मोहम्मद शेख, (मुली) : समिक्षा बोर्डे, मानसी ताजे, अनुष्का देठे, प्रतिक्षा वाघोले, आर्या वाघोले, काव्यांजली भोर
१७ वर्षे वयोगट (मुले) : सुरज भले, आर्यन कानडे, मोहीत ठवळे, स्वराज्य यादव, कार्तिक गंभीर, अर्थव कवड, (मुली) : धनश्री खांडगे, समिक्षा गटकळ, वेदिका शिंदे, आयेशा शेख, सायली बेनके, अक्षदा जाधव
१९ वर्षे वयोगट (मुले) : अभिजित बुळे, ब्रम्हनाथ जाधव, प्रज्वल पोगरखर, आर्यन शिंदे, प्रथमेश मांडे, ओंकार शेळके, (मुली) तन्वी शिंदे, अंजली कानडे, ज्ञानेश्वरी वोघोले, साक्षी सोलाट, सृष्टी वायाळ, साक्षी ठाकर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.