एकच वादा अजित दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
निलेश बुधावले, एबीपी माझा September 22, 2024 03:13 PM

मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  हे दिलेला वादा पूर्ण करणारे म्हणुन राज्यभरात प्रसिद्ध आहेत . शब्दाचा पक्का दादांचा वादा अशी दादाची ख्याती आहे.  पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षातील धाराशिव लोकसभा मतदार संघातून (Dharashiv Lok Sabha Election)  इच्छुक असलेले उमेदवार सुरेश बिराजदार यांना भर सभेत अजित पवार यांनी सुरेश बिराजदार (Suresh Birajdar)  यांना आगामी काळात आमदार करतो असा शब्द दिला होता. या शब्दामुळे सुरेश बिराजदार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती पण अजित पवार यांनी भर सभेत दिलेल्या शब्दाचा व्हिडीओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

सध्या सुरेश बिराजदार हे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषद आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी पक्षाकडे तसा अर्ज देखील केला आहे त्यामुळे दादा आपला वादा पाळणार का हे पाहणे महत्वाचं आहे. धाराशिव जिल्ह्यात दाजी या टोपणनावाने ओळखले जाणारे  सुरेश माणिकराव बिराजदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) प्रदेश उपाध्यक्ष आहेत.सुरेश बिराजदार हे गेल्या 5 वर्षांपासून धाराशीव लोकसभा मतदारसंघात तयारी करत  होते. मात्र ऐनवेळी बदलत्या घडामोडीत त्यांना डावलण्यात आले. मात्र अजित पवारांनी भर सभेत आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

गेली 40 वर्षे सुरेश बिरराजदार  हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या संकट काळात  पक्षाने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली जिल्हा बँक वाचवण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कायम एकनिष्ठपणे राम करत असलेल्या बिराजदार यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. 

नितीन पाटलांचे आश्वासन अजित पवारांनी  केले पूर्ण 

लोकसभा निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली होती. साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नितीन पाटील यांना तिकीट दिले आणि आणि आपले आश्वासन पूर्ण केले. आता नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत. 

हे ही वाचा :

फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा

                    

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.