Ajit Pawar : मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Marathi September 22, 2024 05:24 PM

अजित पवार : महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले. मोहळमध्ये (Mohol) आयोजीत करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पावर म्हणाले.

गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार  आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून. तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले. एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवा दर काय?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.