'ती सव्वा लाखाची पैठणी...', 'होम मिनिस्टर'च्या शेवटच्या भागात पूर्ण झाली अभिनेत्रीची इच्छा; पोस्ट करत म्हणाली...
जयदीप मेढे September 22, 2024 08:43 PM

Home Minister : मागील 20 वर्षांपासून घरोघरी रंगलेला पैठणीचा खेळ आता संपला आहे. आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाने आता निरोप घेतलाय. पण त्यापूर्वी झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा विशेष भाग पार पडला. यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती. 

झी मराठीवरील नायिकाच या भागात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सरस्वती जहागीरदार म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटील हिने ती सव्वा लाखाची पैठणी जिंकली. त्यानंतर भूमिजाने या पैठणीसाठी खास पोस्ट केली आहे. 

भूमिजाची पोस्ट नेमकी काय?

भूमिजाने तिचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, होय ती सव्वा लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की, कधीतरी होम मिनिस्टर मध्ये जावं मग मलाही पैठणी मिळेल आदेश भाऊजींच्या हस्ते. Manifest करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं. मला होम मिनिस्टर मध्ये भाग घेता आलं त्यातच मी खुश होते.  पण माझे सहकलाकार म्हणजेच नवरी मिळे हिटलरला ही टीम माझ्या सोबत होती मला cheer करत होती , त्यांनी मला विश्वास दिला की ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार. आणि ते खरं झालं ती "सव्वा लाखाची पैठणी "माझी झाली आणि ही संधी मला झी मराठी मुळे मिळाली.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumija Patil (@bhumija_arvind_patil)

20 वर्षांचा प्रवास...

'दार उघड बये... दार उघड...' अशी हाक साधारण 20 वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली. आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) कार्यक्रमाचा पहिला भाग 13 सप्टेंबर 2004 मध्ये भेटीला आला होता. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) ते लाडके भावोजी हा साधारण 20 वर्षांचा प्रवास प्रत्येकासाठी खासच आहे. पण आता हा प्रवास संपला असून  20 वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतलाय. 

ही बातमी वाचा : 

Home Minister : 'पैठणी'चं आदेश भावोजींना खास पत्र, 20 वर्षांचा प्रवास संपला, 'होम मिनिस्टर'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.