'देवमाणूस' बनत अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा September 22, 2024 08:43 PM

Crime: उदगीर शहरात अवैध गर्भपात करणाऱ्या (illegal abortion) बोगस डॉक्टरला रंगेहाथ पोलिसांनी पकडल्याचं समोर आलंय. मागील अनेक वर्षापासून बोगस डॉक्टर द्वारे चालवलं जाणार अवैध गर्भपात केंद्रवर पोलिसांचा छापा टाकला असून गर्भपात करत असताना डॉक्टरला पकडण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील उद्गीरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला असून गर्भपाताच्या गोरख धंद्यात किती लोक सहभागी आहेत?त्यांचं नेटवर्क शोधण्यात पोलीस कामाला लागले आहेत.

नक्की प्रकरण काय?

आफिया क्लिनिक नावाने एक दवाखाना उदगीर शहरातील बंनशेळकी रोडवर मागील अनेक वर्षापासून सुरू होता. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना निनावी फोन द्वारे या  ठिकाणी अवैध गर्भपात सेंटर चालवलं जात असल्याची माहिती मिळाली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधला. पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रित या ठिकाणी छापा मारला आहे.

अवैध गर्भपातासाठी हे सेंटर ओळखलं जात होतं..

उद्गीर शहरातील आफिया क्लिनिक हे  या ठिकाणचा सेंटर हे अवैध गर्भपातासाठी ओळखलं जात होतं. येथील डॉक्टर हे ही बोगस असल्याचे निष्पन्न झालं. यामुळे सर्व प्रकार हा गोरख धंदा होता. हे उघड झाल्याने पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेलाही धक्का बसला आहे.

कर्नाटक तेलंगणातील लोकं अवैध गर्भपातासाठी यायचे

गेल्या काही वर्षापासून या भागात या क्लिनिक सेंटरची ओळख गर्भपात सेंटर म्हणून झाली होती. मराठवाड्यातील त्याचप्रमाणे कर्नाटक तेलंगानाने आंध्र प्रदेश मधून ही लोक इथे गर्भपातासाठी येत होते अशी माहिती समोर येत आहे.       आफिया क्लिनिक नावाने बोगस धंदा करणारा इमरान मोमीन यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Vanraj Andekar murder: दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.