Bigg Boss Marathi S5 : बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल बाहेर ! प्रेक्षक म्हणाले...
esakal September 23, 2024 06:45 AM

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 च पर्व सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. आजच्या भाऊच्या धक्क्यावर नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी या सिनेमातील कलाकारांनी स्पर्धकांबरोबर धमाल केलीच आणि सगळ्यांचे भरभरून मनोरंजनही केलं. पण याबरोबरच सगळ्यांना धक्का बसला तो या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमुळे. स्पर्धक अरबाज पटेल या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

या वेळेचा एलिमिनेशन राउंडही खूप इंटरेस्टिंग ठरला. बिग बॉस ने घरातील सगळ्या नॉमिनेट सदस्यांना डेंजर झोन मध्ये बोलावलं. त्यानंतर प्रत्येकाच्या समोर पेट्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यात सेफ किंवा अनसेफ यापैकी एक कार्ड असणार होतं. वर्षा,अभिजीत,सुरज, जान्हवी हे चारही स्पर्धक सेफ झाले तर शेवटी उरले निकी आणि अरबाज आणि यामुळे सगळ्यांनाच काहीसा आनंद झाला होता.

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

डेंजर झोन मध्ये आल्यामुळे निक्की आणि अरबाजची घाबरगुंडी उडाली होती. निकी तर रडू लागली होती. अरबाजने तिला कसतरी शांत केलं. त्यानंतर त्या दोघांनी आपापल्या पेट्या खोलल्या तेव्हा अरबाज अनसेफ झाला आणि या घरातून एलिमीनेट झाल्याचं बिग बॉसनी जाहीर केलं. या एलिमिनेशन मुळे निक्कीला चांगलाच धक्का बसला.

घरातील स्पर्धक जरी या एलिमिनेशनमुळेच चकित झाले असले तरीही प्रेक्षकांनी मात्र सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. अनेकांनी या आठवड्याचे एलिमिनेशन योग्य झालं अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियावर केले आहेत. एकूणच आर्याच्या अविक्शन मुळे नाराज असलेले प्रेक्षक बिग बॉसच्या या निर्णयावर आता काहीसे खुश आहेत.

दरम्यान या आठवड्यात बिग बॉस मराठीमधून दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. संग्राम चौगुले वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर पडला तर अरबाज पटेल एलिमीनेट झाला. आता लवकरच बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठी च्या फायनलिस्ट मध्ये कोण असणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमावर कधीही.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.