चित्रकार अक्षय मेस्त्रीला राष्ट्रीय गौरव पुरस्कार
esakal September 26, 2024 12:45 AM

13777

चित्रकार अक्षय मेस्त्रीला
राष्ट्रीय गौरव पुरस्कार
तळेरे, ता. २५ः गवाणे (ता. देवगड) येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांना नवी मुंबईतील कला साधना सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबईतील कामोठे येथे हा कार्यक्रम पार पडला.
कला साधना सामाजिक संस्था दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. मेस्त्री हे आपल्या चित्रकारितेतून सामाजिक संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. तसेच जखमी प्राणी-पक्ष्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात ते सुखरूप सोडतात. निसर्ग संवर्धनासाठी जनजागृती करतात. हे कार्य पाहता कला साधना सामाजिक संस्थेने राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी मेस्त्री यांची निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा नवी मुंबईतील कामोठे येथे रविवारी झाला. या सोहळ्याला कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुंबईच्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस गफुर शैंख, कवी लेखक नितीन चंदनशिवे आदी उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.