बांदा नाबर प्रशाळेमध्ये संस्कृत वर्गाचे उद्घाटन
esakal September 26, 2024 12:45 AM

13688

बांदा नाबर प्रशाळेमध्ये
संस्कृत वर्गाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ः येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृतचे वर्ग सुरू केले आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कृत विषयात बी. ए. झालेले व साहित्य विशारद पदवी प्राप्त असलेले नरहरी उपाध्ये, संस्कृत शिक्षक तुषार कुडके उपस्थित होते. व्यासपीठावर उपसरपंच राजाराम सावंत, ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, नीलेश कदम, वाय. पी. एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. एस. पी. एम गोवाचे जनरल सेक्रेटरी त्रिविक्रम उपाध्ये, सचिव बालेंद्र सतरकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी प्रास्ताविक केले. राजाराम सावंत यांनी, इंग्रजी माध्यमाची शाळा असून सुद्धा संस्कृतसारखा विषय इथे सुरू होत आहे, ही अभिमानाची आहे, असे सांगितले. नरहरी उपाध्ये यांनी, संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून ही भाषा प्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ पाणिनी यांनी प्रमाणित केली होती. ही भाषा हिंदू ,जैन, बौद्ध धर्मांच्या उपासनेची भाषा आहे, अशी माहिती दिली. या संस्कृत वर्गासाठी शाळेतील तसेच इतर शाळांतील विद्यार्थी, पालक व इतर इच्छुकांनी शाळेच्या शिक्षिका सुमित्रा सावंत यांच्याशी संपर्क साधावा. सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहा गावडे यांनी केले. आभार दीक्षा नाईक यांनी मानले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.