शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून साजिद नाडियादवालासोबत चित्रपट निर्मितीकडे वळणार होतो, पण… राज ठ
Marathi September 26, 2024 01:24 AM

राज ठाकरे, मुंबई : “सन 2000 साली मी वेगळ्या पक्षात होतो. तेव्हा तिकडे जे सुरु होतं, त्याला वैतागून-कंटाळून रिवर्सचा गियर टाकला होता. मला वाटतं होतं राजकारणात राहायला नको. त्या क्षेत्रात पुढे काही करायचं नाही, इच्छाच नाही. राजकारणातून हळूहळू बाहरे पडायचं होतं. त्यावेळेला साजिद नाडियादवाला भेटायचो म्हणायचो आपल्याला चित्रपट निर्मिती  सुरु करायची आहे. पण पुन्हा मी राजकारणाकडे वळण्याचं कारण साजिद नाडियादवाला आहे”, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. येक नंबर या सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुम्ही जिथे आहात, तिथे राहा; साजिद नाडियादवालांनी पुन्हा राजकारणात जाण्यास सांगितलं

राज ठाकरे म्हणाले, साजिद नाडियादवाला मला म्हणाले की, दिग्दर्शक जे काही कामं करतो. ती कामं राज ठाकरेंना करता मी पाहू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथे राहा. सिनेमे बनत राहतील. आताही बनवणार आहोत, पुढेही बनवत राहणार आहोत. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.

पुढे बोलतान राज ठाकरे म्हणाले, आज इतक्या वर्षांनी प्रोडक्शन कंपनी सुरु केली तेजीस्विनी पंडित भेटल्या. रिजिनल फिल्म मोठ्या व्हायला हव्यात आम्हाला पण वाटतंय. अजय अतुल यांना त म्हणलं की ताक पण कळतं आणि ताडी पण कळतं. अनेकांनी मेहनत घेतली… अजय अतुल यांच्यासोबत अनेक वर्ष काम करतोय.

राजेश मापुस्कर यांनी सुरवातीला स्टोरी ऐकवली तेव्हा मी म्हटलं तेव्हा झेपेल ना? फिल्मच्या वेळी अनेक लोकांना त्रास दिला त्यामुळे आजच दिलगिरी व्यक्त करतो. मराठीमधली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर फिल्म ठरुदे, असंही राज ठाकरे म्हणाले.

उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत. परंतु ज्याप्रकारे इतर रिजनल फिल्म मोठ्या होताना दिसत आहेत. त्याप्रमाणे मराठी बनवणं देखील गरजेचं आहे. त्यातून येक नंबर चित्रपट उभा राहिला. केदार शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी येक नंबर हे टायटल दिलं. आज अजय-अतुल इथे आहेत. माझे अजय-अतुल अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत, त्यांचेही आभार मानतो. अरविंद जगताप यांनी सिनेमाला दर्जेदार वळण दिलं, असंही राज ठाकरे म्हणाले.



इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.