रश्मी सामाजिक संस्थेचे प्रेरणादायी रक्तदान शिबिर
esakal September 28, 2024 06:45 AM

पिंपरी, ता. २७ ः सामाजिक बांधिलकीतून रश्मी सामाजिक संस्थेने नुकतेच हिंजवडी येथे आयएफएएस एज्युटेक व पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. ५२ जणांनी यात सहभाग घेतला. त्यास हिंजवडी येथे काम करणाऱ्या व इतर विविध कंपनीच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रक्तदान करण्यापूर्वी पल्स, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि हिमोग्लोबिनची पातळी यासह आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात दोनशे जणांची तपासणी केली. यामुळे आयटी इंजिनियर्सला त्यांच्या आरोग्य बद्दल अधिक जागरूक होण्यास आणि आरोग्याच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यास मदत झाली. या रक्तदान शिबिरासाठी रोमिला तुटू, दादासाहेब सोंडगे, गीतांजली जाधव, यश भोसले, धर्मवीर शर्मा, योगेश राऊत, नागेश आडेराघो आदींनी विशेष सहकार्य केले. आयएफएएस एज्युटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर जगताप उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.