Navratri 2024 : नवरात्रीला सलवार सूटसोबत ट्राय करा हे सुंदर दुप्पटे
Marathi September 28, 2024 08:25 AM

आजकाल प्लेन ड्रेस खूप ट्रेंडमध्ये आहे. प्लेन ड्रेसमध्ये सलवार सूट खूप उत्तम दिसतात. सलवार सूटमध्ये तुम्हाला अनेक रंग आणि प्रकार त्याचबरोबर पर्याय देखील मिळतील. यासाठी रेडिमेड ड्रेस घेण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन फॅब्रिक खरेदी करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार सलवार सूट शिवून घेऊ शकता. आता काही दिवसांनी नवरात्री सुरु होणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही या सलवार सूटसोबत सुंदर ओढणी देखील स्टाइल करू शकता. अशाप्रकारे तुमचा एक नवीन आउटफिट तयार होईल. आज आपण जाणून घेऊयात नवरात्रीला सलवार सूटसोबत कोणत्या सुंदर ओढण्या ट्राय करता येईल.

मिरर वर्क दुपट्टा

मिरर वर्क दुप्पटे खूप सुंदर दिसतात. यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कमधील अनेक डिझाईन्स पाहायला मिळतील. हा दुपट्टा प्रामुख्याने काळ्या, लाल, हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाच्या सूटसोबत घालण्यास प्राधान्य दिले जाते. असे मल्टी-शेडेड दुपट्टे तुम्हाला बाजारात साधारणपणे 300 ते 500 रुपयांना मिळतील.

– जाहिरात –

हॅन्ड वर्क दुपट्टा

तुम्ही या प्रकारच्या हँडवर्क दुपट्ट्याला साध्या सरळ सूट किंवा फ्लेर्ड सूटसह स्टाइल करू शकता. या प्रकारचे दुपट्टे वजनानेही खूप जड असतात. कारण या दुपट्ट्यावर बारीक नक्षीकाम हाताने केले जाते. हे महागड्या रेशीम कापडाच्या मदतीने बनवले जातात. असे दुपट्टे तुम्हाला बाजारात साधारणपणे 400 ते 700 रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.

नेट वर्क स्कार्फ

साध्या डिजाइन पासून ते गोल्डन कलरची बॉर्डर आणि गोटा-पट्टीचे डिझाईन सर्वाधिक पसंत केली जातं आहे. त्याचवेळी, या प्रकारचे दुपट्टे अतिशय फॅन्सी लुक देण्याचे काम करतात. या प्रकारचे दुप्पटे तुम्हाला बाजारात 200 ते 400 रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात. हे बनारसी दुपट्टे तुमच्या सलवार सूटला एक रॉयल टच देतात. त्यातील डिझाईन तुम्हाला नवरात्रीच्या उत्सवाला शोभतील.

– जाहिरात –

फुलकरी दुपट्टा

रंगीबेरंगी आणि भरजरी काम असलेले फुलकारी दुपट्टे पंजाबी पारंपारिकता दाखवतात. यामुळे साध्या सलवार सूटला एकदम खास लुक येतो.

चंदेरी स्कार्फ

चंदेरी कपड्याचे हलके आणि शोभिवंत दुपट्टे तुमच्या लूकला एलिगंट बनवतात. विशेषत: रात्रीच्या कार्यक्रमांसाठी हे उत्तम आहेत.

हेही वाचा : Navratri 2024 : नवरात्रीत धान्य पेरणी अशी करावी


संपादन : प्राची मांजरेकर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.