ग्लोबल सोसायटी येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी
esakal September 29, 2024 12:45 AM

मोशी, ता. २८ : येथील ग्लोबल सोसायटीत शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. सपना भरतेश पाटील यांचा मुलगा बालचित्रकार अद्वैत पाटील याने शहीद भगतसिंग यांच्या काढलेल्या चित्राला त्याच्याच हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. सुभाष कुलकर्णी व लोखंडे यांचे समायोजित भाषणे झाली. किशोर आंबेकर यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनाचा क्रांतिकारी इतिहास सांगितला. नवनीत सोनार यांनी प्रास्ताविक व आभार मानले. भगतसिंग यांच्या काढलेल्या चित्रासाठी अद्वैत पाटील याचे सर्वांनी कौतुक करून त्याला रोख बक्षीस देऊन, चित्रकलेतील पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी ग्लोबल सोसायटी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.