Maharashtra News Live Updates: मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी देणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
Saam TV September 29, 2024 12:45 AM
Mumbai News : मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी देणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी असल्याची माहिती देणाऱ्या मुलाचा लावला पोलिसांनी सुगावा

नवी मुंबईवरून आला होता धमकीचा मेल

अल्पवयीन मुलाची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

गुरवारी आलेल्या इनपुट नंतर संपूर्ण मुंबई हाई अलर्ट वर

मुंबईतल्या धार्मिक स्थळांवर बॉम्बलास्ट होणार असा होता धमकीचा आशय.

मेलनंतर सर्व धार्मिक स्थळांवर बंदोबस्त वाढवला आला होता.

सर्व बॉम्बल्स्टमधील जुने आरोपी तसेच बंदी घातलेल्या संघटनाही तपासल्या

अनेक ठिकाणी मॉक ड्रील असल्याचे सांगत करण्यात आले होते सर्च ऑपरेशन.

faruk shah News : आमदार फारुक शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उधळलेल्या फुलांवरून विरोधक आक्रमक

औरंगजेबाच्या कबरीवर फुल उधळणाऱ्या आमदाराला महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्याचबरोबर एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी हे कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचे आमदार फारुक शहा यांना जनता कधीही खपवून घेणार नाही, त्याचबरोबर हा संपूर्ण महाराष्ट्र असे कृत्य कधीही खपवून घेणार नाही, अशी भावना धुळ्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी व्यक्त करत, धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उधळलेल्या फुलांवरून चांगलाच निशाणा साधला आहे.

Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच मगरींची पिल्ल जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच मगरींची पिल्ल जप्त केली आहेत. सर्जिकल मास्कमध्ये गुंडाळून मगरींच्या पिल्लांची तस्करी सुरू होती. मगरींची पिल्ल केमन क्रोकोडाइल जातीची आहेत. बँकॉकवरून आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर विभागाने कारवाई केली आहे. मोहम्मद रेहान अजमेरी आणि हमझा युसुफ मंसुरी नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

sudhir mungantiwar : नवरात्रीत भाजप उमेदवारांची यादी जाहीर होईल - सुधीर मुनगंटीवार

नवरात्रीमध्ये उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे सांगतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीचे पूर्ण नियोजन झाले असल्याची माहिती दिली. ते चंद्रपुरात माध्यमांशी बोलत होते.

Akshay Shinde Case : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा क्षण रिक्रिएट करणार

अक्षय शिंदे याच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे तळोजा कारागृहाजवळ दाखल

अक्षय शिंदे यांच्या वडिलांचे वकील crime सिन रिक्रिएट करणार आहेत.

तळोजा जेल ते मुंब्रा बायपासपर्यंत पाहणी करणार

Eknath Shinde News : मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा

- मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

- मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी

- तर धनगर समाजातील १०० विद्यार्थी आणि १०० विद्यार्थिनींसाठी वसतिगृह

- भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून वसतिगृहाच्या उभारणीच भूमिपूजन

कुलाबा, कल्याण, पुणे कँफ, कुर्ला यासारख्या ठिकाणी कमी मतदान होतं. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे. जम्मू कश्मिरपेक्षाही कमी मतदान महाराष्ट्रात काही शहरी भागात होत आलेय. लोकांनी मतदानासाठी घराबाहेर करावे. आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी मतदारांनी घराबाहेर पडावे. निवडणुकाच्या तारखांची घोषणा कराताना लागोपाठ सुट्ट्या येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्याव्यात. जेणेकरुन लोक सुट्ट्या घेऊन बाहेर जाऊ नयेत. मतदान करावे. विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंना मोठं यश.... आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचा जल्लोष सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच वरचष्मा राहिला. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केलाय. आदित ठाकरे कार्यकर्तांना संबोधित करणार आहेत. संजय शिरसाठमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतला आहे. आर्थिक ताळमेळ विचार करून ही योजना सुरू केली. त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरतूद केली आहे. राज्य खड्ड्यात जाणार नाही, प्रगती वर जात आहे. राज्यात सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात होणार

राज्यात सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात होणार

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार शुभारंभ

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

केरळा स्टोरीज फेम अभिनेत्री अदा शर्मा यांचीही प्रमुख उपस्थिती असेल

आयटीआय प्रशिक्षणार्थींसोबत सर्वसामान्य युवती व महिलांना प्रशिक्षण देणार

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्री लोढा यांचा नवा उपक्रम

संजय शिरसाठदिघे साहेबांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना सत्य कळायला हवं. Latur News: जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावर माझं लातूर परिवार आक्रमक सत्ताधारी राजकीय नेत्यांचे मुखवटे घालून भिक मागो आंदोलन...

लातूर जिल्हा रुग्णालयाच्या रखलेला प्रश्नासाठी . आता माझं लातूर परिवाराने आक्रमक पवित्रा घेतला आहे... आज परिवारातील सदस्यांनी सत्ताधारी नेत्यांचे प्रतीकात्मक मुखवटे घालत लातूर शहरात भीक मागो आंदोलन केले आहे.. केवळ निधी अभावी जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न धुळखत पडला आहे...अनेकदा आंदोलन करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने ,आता येत्या 1 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी माझं लातूर परिवारातील सदस्यांनी दिला आहे...

Mumbai News: कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण

कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात येणार.

या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Washim News: बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे रस्त्याची अत्यंत दुरवस्था, रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करतांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तर चार चाकी वाहनाने जात असताना हे वाहन चिखलात फसले तर या वाहनाला धक्का मारून चिखलातून बाहेर काढावे लागते. यात अनेक वेळा अपघात घडत असल्याने नागरिकांना दुखापत होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये मासेमारीला पुन्हा सुरुवात, खवय्यांची गर्दी

गेले तीन ते चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळ सदृश्य स्थिती असल्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली होती मात्र काल पासुन पुन्हा मासेमारीला सुरूवात झाली आहे. आज मालवण मध्ये मोठ्याप्रमाणात मासे लिलावासाठी आल्यामुळे मस्य खवय्यानी एकच गर्दी केली होती. मालवण बीच वर सकाळी सात वाजल्यापासून मासे लिलावाला सुरूवात झाल्यानंतर मासे खरेदीसाठी स्थानिकांसोबतच पर्यटकही मासे लिलाव बघण्यासाठी दाखल झाले होते. आजच्या मासे लिलावात सुरमई, बांगडा, माकूल, लेपे, कोळंबी, व हलवा मोठ्याप्रमाणात आला होता. त्यामुळे खवय्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री छगन भुजबळ हे आज थेट हॉस्पिटल मधून नाशिकला जाणार विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

अजित पवार यांना घड्याळ ऐवजी दुसर चिन्ह देण्याची शरद पवार यांच्या पक्षाची मागणी

सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली होती मागणी

१ ऑक्टोबरला याचिकेवर होणार सुनावणी

सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार
  • विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार

  • राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता भाजपचा ओबीसी मतांवर डोळा

  • ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न

  • पुढचा महिनाभर राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार

  • ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांचे आदेश

गिरीश महाजनखडसेंची आणि माझी नार्कोटेस करा. खरं ते समोर येईल. नेहमी भाषणात माझा विषय असतो. सारखं सीडी आहे, डिलीट झाली. माझा भाजपात प्रवेश झाला पण फोटो मिळत नाही. Latur News : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे महावितरण च्या कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे... कनिष्ठ अभियंता अमोल सूर्यवंशी हे आपल्या कार्यालयात काम करत होते , दरम्यान यावेळी कृष्णा जाधव या युवकाने.. शेतात लाईटचे पोल झुकला आहे.. त्याची काम कधी करणार. यावर जाब विचारत मारहाण केली आहे... तर या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या युवका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे..

Sangli News : संजयकाका पाटलांची,रोहित पाटलांवर टीका

भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांवर जोरदार टीका केली आहे कवठेमंकाळ मधल्या राड्याप्रकरणी रोहित पाटलांकडून घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत, राजकीय हेतूने रोहित पाटलांनी पोलिसांच्यावर दबाव आणून आपल्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप देखील संजयकाका पाटलांनी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष यांना संजयकाका पाटलांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्या समोर आंदोलन केलं होतं,त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, यावर संजयकाका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Kolhapur News: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा आज शुभारंभ, ८०० लाभार्थी अयोध्येला रवाना

कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी होणार अयोध्येला रवाना.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर फक्त ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

- दररोज लाखो प्रवासी प्रवास करणार्या पुणे रेल्वे स्थानकावर केवळ ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत.

- अवाढव्य पुणे स्थानकावर फक्त एकूण १२० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

- ⁠यापैकी ७४ कॅमेरे सध्या पुणे रेल्वे स्थानकात कार्यरत.

- ⁠प्रवासी आणि रेल्वे स्थानकाचा आकार यातुलनेत सीसीटीव्हीची संख्या अपुरी.

- ⁠त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ⁠

Mumbai News: आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?: प्रवीण दरेकर

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं सामना अग्रलेखाला चोख प्रत्युत्तर

आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?

देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू, तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी ते ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी सक्षम

‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल?

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा संजय राऊत यांना सवाल

Tirupati Prasad: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी.

सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी दाखल केल्या होत्या याचिका.

लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी

नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी.

आणखीन १० विद्यार्थीनी केल्या तक्रारी.

विनयभंगाच्या आरोपानंतर सहाय्यक प्राध्यापकाला करण्यात आल होत निलंबित.

चौकशी समितीसमोर करण्यात आल्या तक्रारी.

प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.