नसरल्लाहच्या मृत्यूनंतर 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित, इराकचा इस्रायलला इशारा
GH News September 29, 2024 01:09 AM

दहशतवाद्यांना त्यांच्याकडच्याच पेजरमध्ये स्फोट घडवून ठार केल्यानंतर आता हिजबुल्लाहच्या सर्वेसर्वाचाही इस्रायलनं मारलं आहे. बेरूतमधल्या हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 80 टन वजनाच्या बॉम्ब इस्रायलनं टाकला होता. त्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह ठार झाला. या स्फोटात आजूबाजूच्या 6 इमारती कोसळल्या. या हल्ल्यानंतर आता जगाला नसरल्लाहपासून घाबरण्याची गरज नाही अशी पोस्ट इस्रायली सैन्यानं केली आहे. माहितीनुसार हिजबुल्लाहचा चीफ नसराल्लाहचा ठावठिकाणा इस्रायलला आठवडाभरआधीच माहिती होता. त्यासाठी मोठी योजनाही आखली जात होती. पण नसराल्लाह स्थलांतर करण्याची शंका इस्रायलला आली. त्यामुळे कालच अमेरिका दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मुख्यालयावर हल्ल्याचे आदेश दिले. त्याचा एक फोटोही समोर आलाय.

या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव अजून वाढलाय. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या जाणकारांच्या मते सध्याच्या घटनांमुळे येत्या एक ते दोन महिन्यात अजून स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. जग दोन भागात विभागून पुन्हा युद्धाचा वणवा पेटण्याचीही चिन्ह आहेत. इस्रायलची भूमी कुणाची यावरुन शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या वादात अमेरिका इस्रायलचा पाठिराखा आहे. तर सीरिया, पॅलेस्टाईन, लेबनॉन, इराकसह इस्रायलचे शेजारी देश याविरोधात अनेक वर्ष एकमेकांशी झगडतायत. तूर्तास नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इराकनं ३ दिवसांच्या राष्ट्रीय शोक घोषित करत इस्रायलला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

इस्रायलने शुक्रवारी लेबनॉनमध्ये हवाई हल्ला केला. नसराल्लाहला मारण्यासाठीच ही इस्रायलने केलेली खास कारवाई होती. यामध्ये इस्रायली संरक्षण दल, सरकार आणि गुप्तचर संस्था यांचा समावेश होता. इस्रायली सैन्याचं हे आणखी एक मोठं ऑपरेशन होतं. जेरुसलेम पोस्टने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, हे ऑपरेशन नियोजित होतं आणि मग अंमलात आणण्यात आले.

जेरुसलेम पोस्टच्या अहवालानुसार, गुप्तचर संस्थेच्या प्रगत क्षमतेच्या आधारे, माजी गुप्तचर विभाग प्रमुख आरोन हलिवाने 11 ऑक्टोबर रोजी हसन नसराल्लाहला लक्ष्य करण्याची योजना आखली होती. यानंतर नसरल्ला कुठे लपला आहे आणि तो कुठे येतो आणि जातो हे शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले.

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नसराल्लाह यांच्या हत्येसाठी राजकीय आणि गुप्तचर यंत्रणांनी बुधवारपर्यंत परिस्थिती निश्चित केली होती. बुधवारी हिजबुल्लाच्या नेतृत्वाच्या बैठकीच्या वेळेची माहिती मिळाल्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही अमेरिकेला जाऊन हिजबुल्लाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.