Akshay Shinde: कळवा रुग्णालयातून मृतदेह पाठवल्यापासून ते दफनविधीपर्यंत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण प्रकरण...
esakal September 30, 2024 08:45 AM

बदलापूर येथील शाळेत निष्पाप मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर अखेर उल्हासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी यापूर्वी खड्डाही खोदण्यात आला होता. मात्र शिवसेनेतील शिंदे गटातील लोकांनी तो खड्डा बुजवला होता. उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात आला. स्मशानभूमीत शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांचा अतिरिक्त ताफा स्मशानभूमीत दाखल झाल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अक्षय शिंदे जर बदलापूरमध्ये राहत असेल तर त्याला तिथेच दफन करावे, असा निर्धार शिवसैनिकांनी केला होता. दरम्यान, पुन्हा खड्डा बुजवण्यासाठी उल्हासनगर स्मशानभूमीतही जेसीबी दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा खड्डा खोदण्यात आला आहे.

Akshay Shinde: जंगलात पुरा नाहीतर...; अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला तृतीयपंथीयांचा विरोध, दिला थेट इशारा

अक्षय शिंदेचे आई-वडील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कळवा रुग्णालयात पोहोचले होते. अक्षय शिंदेच्या पालकांना पोलीस बंदोबस्तात शवागारात नेण्यात आले. अक्षय शिंदेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आला. ठाणे पोलीस तपास अधिकारी आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत अक्षय शिंदेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कळवा रुग्णालयाबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

त्यानंतर अक्षयचा मृतदेह उल्हासनगरमध्ये आणण्यात आला. त्यानंतर अक्षयचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. यावेळी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान अक्षयचा अखेरचे पाहताना त्याच्या आईवडिलांनी हंबरडा फोडल्याचे पहायला मिळाले.

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या मृतदेहावर सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. त्याचा मृतदेह लवकरात लवकर दफन करण्याची सूचनाही हायकोर्टाने पोलिसांना केली. बदलापूरमध्ये अक्षयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोक आणि मनसेने विरोध केला. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना कडक आदेश दिले. अक्षय शिंदेच्या पार्थिवावर सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यासाठी पावले उचलावीत, असेही उच्च न्यायालयाने म्हटले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.