काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज?
Marathi October 02, 2024 10:24 AM

मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजना : शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana) जाहीर केली आहे. या योजनेनुसार 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 10  हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, योजनेसाठी आत्तापर्यंत 4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज केले आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटींची तरतूद

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री  युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवार हा 18 ते 35 वयोगटातील असणं गरजेचं आहे. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळमार आहेत. या योजनेसाठी आत्तापर्यंत 3 लाख 54 हजार 64 युवांनी तर 10 हजार 356 खाजगी व शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली आहे.

योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगाराच्या संधी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून  12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 10  हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या योजनेसाठी  4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज केले आहेत. आत्तापर्यंत या योजनेसाठी 1 लाख 69 हजार 988 उमेदवारांची निवड झाली आहे. यापैकी 82 हजार 281 युवक व युवती प्रत्यत्र रुजू झाले असल्याची माहिती सरकारच्या वतीमनं देम्यात आली आहे.

खासगी व शासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार

लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, 2013 मधील सेक्शन 8) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना व उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

महत्वाच्या बातम्या:

अमेरिकेत कर्ज स्वस्त, भारतात घर, गाड्यांच्या कर्जावरील व्याजदर कमी होणार का? RBI नेमकं काय कारणार?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.