अभिनेत्री तृप्ती डिमरी 5.5 लाख रुपये फी घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर असल्याचा आरोप, महिलांनी पोस्टरला फासलं काळं
नामदेव जगताप October 02, 2024 11:43 AM

Tripti Dimri Controversy : अभिनेत्री तृप्ती डिमरी तिचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या तृप्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याआधी तृप्ती डिमरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका कार्यक्रमासाठी पैसे घेऊनही त्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा आरोप अभिनेत्री तृप्ती डिमरीवर करण्यात येत आहे.

अभिनेत्री पैसे घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर असल्याचा आरोप

अभिनेत्री तृप्ती डिमरीने फी घेऊन कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा आरोप जयपूरच्या इव्हेंट आयोजकांनी केला आहे. तृप्ती डिमरी हिच्यावर जयपूरमधील एका कार्यक्रमासाठी 5.5 लाख रुपये मानधन घेतल्याचा दावा इंव्हेंट आयोजकांकडून केला जात असून आणि त्यानंतर तिने कार्यक्रमालाही हजेरी लावली नसल्याचा आरोप आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही महिला तृप्ती डिमरीवर आरोप करताना आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा दावा करताना दिसत आहेत.

महिलांनी पोस्टरला फासलं काळं

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला म्हणतेय ती, 'तिचे चित्रपट कोणीही पाहणार नाही. आश्वासन देऊनही ती आली नाही, तिने आपला वेळ मॅनेज करायला शिकावं. ती अजून एवढी मोठी झाली नाहीय, तिचं नावही कुणाला माहीत नाही. ती कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. ती सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही. व्हिडीओमध्ये ती महिला तृप्तीच्या पोस्टरला काळ्या मार्करने क्रॉस करताना दिसत आहे आणि म्हणते आहे की, 'तिचा चेहरा काळा करा.'

तृप्ती डिमरी 5.5 लाख रुपये घेतल्याचा दावा

कार्यक्रमामधील दुसरी महिला म्हणत आहे की 'आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल करू. जयपूरने तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा. तिने आज आमची प्रतिष्ठा डागाळली आहे. तिने माझ्याकडून साडेपाच लाख रुपये घेतले आहेत. तिने येथील सर्वांचा अनादर केला. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकूया. दरम्यान, एबीपी न्यूज या आरोपांना दुजोरा देत नाही, तसेच तृप्ती डिमरीकडूनही या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Bigg Boss Marathi : "फिनालेमध्ये पोहोचली तरी ट्रॉफी...", अभिनेत्रीचा निक्कीवर जोरदार निशाणा; 'या' आवडत्या सदस्याने ट्रॉफी जिंकण्याची इच्छा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.