Surya Grahan 2024 : सूर्यग्रहण संपल्यानंतर लगेच करा 'हे' ५ पाच काम, घरात राहणार नाही नकारात्मक ऊर्जा
esakal October 02, 2024 03:45 PM

Surya Grahan 2024 : या वर्षातील हे सूर्य ग्रहण शेवट आहे. हे सूर्य ग्रहण ६ तास ४ मिनिटे असणार आहे. तसेच आज सर्व पितृ अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणात सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या दिवशी होते, तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते. सूर्यग्रहणात सुतक काळात जेवण करणे, पूजा करणे यासारख्या गोष्टी करणे टाळावे. यावेळी मंदिरांचे दरवाजेही बंद असतात. सूर्यग्रहणाची वेळ काय आहे आणि सूर्यग्रहण संपल्यावर काय करावे हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

सूर्यग्रहण संपल्यानंतर पुढील काम करावे

सूर्यग्रहण संपल्यानंतर लगेच देवघरासह संपूर्ण घर गंगाजल शिंपडावे.

त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. जुने कपडे स्वच्छ धुवावे.

सूर्यग्रहण संपल्यानंतर देवघरातील सर्व देवी-देवतांना आंघोळ करून त्यांचे कपडे बदलावे. देवांची पूजा करावी, अन्नदान करावे आणि आरती करावी.

तसेच घंटा आणि शंख वाजवल्याने ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा कमी होते.

देवांची पूजा केल्यानंतर गहू, लाल वस्त्र, लाल फळे, लाल फुले इत्यादींचे दान करावे. कारण या सर्व गोष्टी सूर्यदेवाशी संबंधित आहेत.

सूर्य ग्रहण संपल्यानंतरच स्वयंपाक करू शकता. त्यामध्ये तुळशीची पानेही टाकावी. गर्भवती महिलांनी आपल्या बाळांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या ज्योतिषीय उपायांना घराबाहेर ठेवावे.

Sarva Pitru Amavasya 2024 : सुर्य ग्रहण अन् सर्वपित्री अमावस्या एकाच दिवशी, काय करावे अन् काय नाही, वाचा सविस्तर सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला रात्री 9: 13 लागणार आहे. हे सूर्यग्रहण 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 3:17 वाजता संपणार आहे. हे सूर्यग्रहण एकूण 6 तास 4 मिनिटे चालणार आहे.

कुठे पाहता येणार?

हे सूर्यग्रहण चिली, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, उरुग्वे, पेरू, न्यूझीलंड, अमेरिका, यासारख्या देशांमध्ये दिसणार आहे. मात्र, संपूर्ण सूर्यग्रहण चिली आणि अर्जेंटिनामध्ये पाहता येणार आहे.

भारतात सुतक असणार का?

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही. ते भारतात दिसले असते तर त्याचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू झाला असता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.