राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
जयदीप भगत, बारामती October 02, 2024 06:13 PM

बारामती : बारामतीमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (MP Sunetra Pawar and youth leader Yugendra Pawar) आमनेसामने आले. यावेळी युगेंद्र पवार यांनी नमस्कार करत खासदार सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले. युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवार समोर आल्यानंतर राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेत संस्कृती जपली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या अभिवादनावेळी बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. 

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार बॅनर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे  (Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. 

लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता. आता, बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावागावात युगेंद्र पवार जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजून सांगत आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.    

दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल

बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.