मनोज जरांगे आंदोलनाची वात पुन्हा पेटवणार, डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका
Marathi October 02, 2024 04:24 PM

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगेंना (Manoj Jarange)  उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे परवा अंतरवालीत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरधाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात बैठकांचा धडाका सुरू होणार आहे.   दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार आहे.   सगळ्यांनी एकत्र यावे नेत्यांच्या मागे फिरू नये. एखादा व्यक्ती  समाजाचं मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे म्हणााले. मनोज जरांगे माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले,  आता माझी तब्येत ठीक आहे.  उद्या दुपारी 12 वाजता सुट्टी घेऊन अंतरवालीकडे जाणार आहे.मात्र दासर मेळाव्याचे नियोजन करायला जाणार आहे. मी भक्त आहे तिथे येणारे भक्त असणार आहे.अठरा पगड जातींच्या लोकांना उत्सव आहे.गडावर पूर्ण तयारी सुरू आहे. 52 हजार स्वयंसेवक आहे.मराठा समाजाची इच्छा होती मराठ्यांचा मेळावा झालं पाहजे तो आता होत आहे. सध्या  गडावर जेवणाची तयारी सुरू आहे.वैद्यकीय सुविधा,पाण्याची सुविधा,महिलांसाठी शौचालय अस सगळ्या सुविधा करण्याची तयारी सुरू आहे.  आता सगळ्यांनी एकत्र यावे नेत्यांच्या मागे फिरू नये,ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आपल्या दारात येतात.समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही.

समाजाचं वाटोळं करणाऱ्यांच्या सोबत राहू नका : मनोज जरांगे

सरकारवर देखील मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे म्हणाले,  आम्हाला राजकारणात जोडू नका,एकत्र करून मोट बांधली म्हणत असाल मात्र आम्ही डाव टाकला तर मोट उलटली असेल.मराठे तुम्हाला रसातळाला मिळवतील.आम्हला  या भानगडीत पडायचं नसेल तर आम्हाला आरक्षण द्या,द्वेष मनात ठेऊन काम करायचं आहे. मराठा नेत्यांनी तुमच्या नेत्याला  फडणवीसाला समजून सांगा मी राजकारणाचा एक शब्द काढणार नाही. मला महायुती – आघाडीत काही घेणे देणे नाही. भाजप नेता आरक्षण देत नसेल तर समाजाचं वाटोळं करणाऱ्यांच्या सोबत राहू नका.

मुस्लीम लोकांनी जातीवर बोलू नका : मनोज जरांगे

देवेंद्र फडणवीसांवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले,  लव जिहाद असे शब्द वापरत आहे काय वाईट केलं यांच? यांच्या विरोधात मतदान केलं तर दलित – मुस्लिमविरुद्ध मराठ्यांनी मत दिली नाही तर जातीवाद म्हणता. मुस्लीम लोकांनी जातीवर बोलू नका, आमच्या मुलींना त्रास देऊ नका मग बघतो आरक्षण कसं देत नाही. सहा पक्षाच्या लोकांना सत्ताधाऱ्यांना वाटतं आमचं वातावरण झालं मात्र एक दिवस वाटेल सगळं गटारात गेलं. तुम्ही गोर गरीब लोकांचे रक्त पित आहे.

राजरत्न आंबेडकरांविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,  तिसरी आघाडी वगैरे काही नाही, ठरलं तर सगळे अपक्ष…  नाही ठरलं तर पाडापाडी होईल.राजरत्न आंबेडकर यांचं प्रेम आहे ते बोलतात .ठरलं तर गोर गरिबांचे लेकर,मी स्वार्थी नाही. मी समाजासाठी काम करतो.

Manoj Jarange Video : अंतरवालीत बैठकांचा धडाका

हे ही वाचा :

रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.