Nitin Chavan journalist passed away mumbai marathi
Marathi October 02, 2024 04:24 PM


वृत्तपत्र लेखनापासून सुरुवात करणार्‍या चव्हाण यांनी सामाजिक, नागरी, सांस्कृतिक आदी विविध विषयांवर विपुल लेखन केले.

मुंबई : ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (वय 53 वर्षे) यांचे मंगळवारी (1 ऑक्टोबर) पहाटे विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले काही महिने ते फुप्फुसाच्या विकाराने आजारी होते. (Nitin Chavan journalist passed away mumbai marathi)

हेही वाचा : Kalyan : वीज प्रवाह खंडीत झाल्याने ठाकुर्ली कल्याण दरम्यान मध्य रेल्वे विस्कळीत 

– Advertisement –

ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण हे गेली 27 वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत होते. गेल्या 15 वर्षांपासून ते दैनिक महाराष्ट्र टाइम्स या अग्रमानांकित वृत्तपत्रात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. गेल्या 18-20 वर्षांपासून ते मुंबई महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाचे वृत्त संकलन करीत होते. त्यांनी 1987 च्या सुमारास वृत्तपत्र लेखन करत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकारितेला दैनिक मुंबई तरुण भारतमधून प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी काही वर्षे दैनिक सकाळ, काही वर्षे दैनिक सामना मध्ये कामकाज केले होते.

वृत्तपत्र लेखनापासून सुरुवात करणार्‍या चव्हाण यांनी सामाजिक, नागरी, सांस्कृतिक आदी विविध विषयांवर विपुल लेखन केले. विशेषत: गिरणी कामगारांचे प्रश्न आणि मुंबईकरांना भेडसावणार्‍या दैनंदिन समस्यांवर त्यांनी आपल्या वार्तांकनातून आवाज उठवला होता. कोकणी माणूस आणि मालवणी भाषेवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कामगार, झोपडपट्टीवासी, भाडेकरू, मुंबईतील मैदाने, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लेखनाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणार्‍या ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.