Fashion Tips : खास सोहळ्यासाठी ट्राय करा सेलिब्रिटी लेहेंगा
Marathi October 02, 2024 06:25 PM

महिला खास सोहळ्यासाठी किंवा एखाद्या प्रसंगासाठी साडीव्यतिरिक्त लेहेंगा घालायला जास्त पसंत करतात. हा लहेंगा साडीपेक्षा जास्त आरामदायी आणि सहजपणे कॅरी करता येताे. लेहंगा चांगल्या प्रकारे स्टाइल केल्याने तुम्ही खूप सुंदर दिसाल. सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या प्रमाणे परफेक्ट लेहंगा स्टाइल करून घालतात. त्यामुळे त्या खूप सुंदर दिसतात. तसेच जर तुम्हाला कोणत्या पार्टीला किंवा लग्न समारंभामध्ये लेहंगा एक उत्तम पर्याय ठरू शकताे.आजकाल लेहेंग्यामध्ये असंख्य प्रकार आले आहेत. जर तुम्हाला तुमचा लूक परफेकट आणि सेलिब्रिटी सारखा करायचा असेल तर आज आपण जाणून घेऊयात खास सोहळ्यासाठी कोणता सेलिब्रिटी लेहेंगा ट्राय करता येईल.

गोल्डन लेहंगा

सारा अली खानने डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा घातला आहे. या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही या प्रकारचा लेहेंगा देखील घालू शकता. यासाठी तुम्हाला योग्य फिटिंग आणि डिझाइनसह लेहेंगा तयार करावा लागेल. यानंतर लेहंग्यावर योग्य दुपट्टा आणि ॲक्सेसरीज घालाव्या लागतील.या लूकमध्ये तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीसारख्या सुंदर दिसाल .

– जाहिरात –

मल्टी कलर लेहंगा

आजकाल बऱ्याच सेलिब्रिटी मल्टी कलर लेहंगा घालतात. हा लेहंगा खूप सुंदर वाटतो . मल्टी कलर लहंग्यामध्ये सर्व रंग असतात. या लेहंग्यावर ऑक्सिडाइड ॲक्सेसरीज खूप सुंदर दिसतील. हा मल्टी कलर लहंगा तुम्ही नवरात्रीमध्ये देखील घालू शकता. जर तुम्हाला हा स्टाइल करता येत नसेल तर तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटीकडून आयडिया घेऊन तसं स्टाइल करू शकता.

बॉर्डर डिझायनर लेहंगा

माधुरी दीक्षितप्रमाणे सुंदर दिसण्यासाठी तुम्ही खास प्रसंगी बॉर्डर डिझाइन केलेला लेहेंगा देखील घालू शकता. या प्रकारचा लेहेंगा घातल्यानंतर तुम्ही सुंदर दिसाल. याशिवाय या लेहेंग्यामध्ये लूकही खूप परफेक्ट दिसतो. या प्रकारच्या लेहेंगाच्या तळाशी बॉर्डर डिझाइन असते. याशिवाय ब्लाउजही खूप कमाल दिसतो. या प्रकारच्या लेहेंग्यात तुम्हाला नेट दुपट्टा मिळतो, ज्यामुळे लेहंग्याचे डिझाईन चांगल्या प्रकारे हायलाइट करता येते. तुम्हीही असे लेहेंगा बाजारात किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. याची किंमत साधारपणे तुम्हाला 1,००० ते 5,००० पर्यत मिळेल.

– जाहिरात –

डिझायनर लेहंगा

आजकाल बऱ्याच सेलिब्रिटी खास सोहळ्यांमध्ये डिझायनर लेहंगा घालतात. डिझायनर लेहंगा एक रॉयल लूक देताे. तुम्हाला देखील हा रॉयल लूक पाहिजे असेल तर तुम्ही रेड किंवा रॉयल ब्लु लेहंगा ट्राय करू शकता. या लेहंग्यामध्ये तुम्ही एका अभिनेत्री सारख्या सुंदर दिसाल.

हेही वाचा : Durga Puja 2024 : दुर्गापूजेला करा सेलेब्रिटी लूक


संपादन : प्राची मांजरेकर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.