पंचवटी उद्यानाचे देहूत उद्घाटन
esakal October 02, 2024 11:45 PM

देहू, ता. २ ः देहू नगरपंचायत व संत निरंकारी मिशन यांच्यावतीने बुधवारी (ता. २) देहू नगरपंचायत हद्दीतील सरकारी गायरान येथे पंचवटी उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, बांबू लागवड मोहीम सुरु करून देशी वृक्ष वड, पिंपळ, आवळा, बेल, अशोक या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, वृक्षदाई संस्थेचे शिवाजी महाराज मोरे, संत निरंकारी मिशन संस्थेचे सर्व पदाधिकारी व देहू नगरपंचायतीचे सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी देहू नगरपंचायतीच्यावतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ देखील संपन्न झाला. यामध्ये सुनंदा बुधावले यांनी प्रथम क्रमांक, आयुष गाडे यांनी द्वितीय तर अर्णव मोरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

देहू ः देहू नगरपंचायतच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.