उल्हासनगर पालिका मुख्यालयात शोभिवंत झाडे
esakal October 02, 2024 11:45 PM

उल्हासनगर पालिका मुख्यालयात शोभिवंत झाडे

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : ऑफिस मुख्यालय सौंदर्यीकरण उपक्रमांतर्गत उल्हासनगर महापालिका सावलीत वाढणाऱ्या शोभिवंत झाडांनी सजली आहे. आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षिका दिप्ती पवार यांनी मुख्यालयाचा अंतर्गत परिसर आणि मुख्य अधिकाऱ्यांची दालने सावलीत वाढणाऱ्या शोभिवंत झाडांनी वलयांकित केली आहेत.

प्रवेशद्वार, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पूर्णाकृती पुतळा, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मध्यम आकाराची झाडे, तसेच आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख यांची दालने व स्थायी समिती सभागृहे लहान शोभिवंत झाडांनी सजवण्यात आली आहेत. महापालिकेत लक्षवेधक कुंड्यात लावलेल्या शोभिवंत झाडांची सावलीत वाढ होते. ही झाडे थोडीशी वाढल्यावर त्यांना गोल आकार मिळणार आहे. त्यामुळे ती अधिक लक्षवेधक ठरणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षिका दिप्ती पवार यांनी दिली. पदभार हाती घेताच आयुक्त विकास ढाकणे यांनी पालिका परिसराची भंगाराच्या सामानातून सुटका केली. त्यामुळेच पालिकेचा परिसर चकाचक दिसू लागला आहे. आता विकास ढाकणे यांच्या संकल्पेनेतून सावलीत वाढणाऱ्या शोभिवंत झाडांनी पालिका सजवण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.