Besan Face Scrub : त्वचेवर साचलेला मळ काही मिनिटांतच होईल गायब, घरीच बनवा बेसनचा हा फेस पॅक
Times Now Marathi October 03, 2024 03:45 AM

Besan Face Scrub : चमकणारी त्वचा कोणाला आवडणार नाही? चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेली अनेक कॉस्मेटिक उत्पादने वापरतात. पण बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये केमिकल्स असतात ज्यामुळे त्यांच्यापासून त्वचेला इजा होते. तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी बेसनाचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी बेसनाचा फेस पॅक कसा तयार करू शकतो हे सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा चमकदार होऊ शकते.

बेसन आणि मुलतानी मातीतेलकट त्वचेपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही बेसन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक वापरू शकता. फेस पॅक बनवण्यासाठी बेसन आणि मुलतानी माती सम प्रमाणात मिसळून पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोनदा वापरल्याने तुम्हाला फरक दिसेल.

बेसन आणि हळदअँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांनी समृद्ध बेसन त्वचेचे मुरुमांपासून संरक्षण करते. फेस पॅक तयार करण्यासाठी चिमूटभर हळदीत 2 चमचे बेसन मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

बेसन आणि टोमॅटोयासाठी 2 चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार टोमॅटोचा रस मिसळा आणि फेस पॅक तयार करा. 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा.

बेसन आणि दहीबेसन आणि दह्यापासून बनवलेला फेस पॅक वापरल्याने टॅनिंगची समस्या दूर होते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार दही मिसळा आणि चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनी सुकल्यावर धुवा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.