Goa News: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिवोलीत नायजेरियन विद्यार्थ्याला अटक; गोव्यातील ठळक बातम्या
dainikgomantak October 03, 2024 05:45 AM
गोव्याच्या हितविरोधी सर्व टीसीपी दुरुस्त्या रद्द करू! Congress

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर गोव्याच्या हिताविरोधातील जमीन रुपांतरण, डोंगर कापणी आणि बेसुमार जमीन विक्रीला वाव देणाऱ्या सर्व कायदे दुरुस्त्या रद्द करू. काँग्रेस प्रदेसाध्यक्ष अमीत पाटकरांचे प्रतिपादन.

शिवोलीत नायजेरियन नागरिकाला अटक, अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता पोलिसांची कारवाई

अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता नायजेरियन नागरिकाला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत ४.६ लाख किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. इनोसंट एनझेडिग्वे (२३) असे अटक करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे.

गांधी जयंती दिवशी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून शांतीचा संदेश!

धर्माच्या नावाखाली पोलिस स्थानकांवर मोर्चे काढू नका. संयम बाळगा. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचा संदेश. राज्यात मुस्लिम बांधवांच्या जुलूस रॅलीवरुन मुस्लिम आणि हिंदू धर्मीय संघटनांमध्ये तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन.

गोव्याच्या महिलांना क्रिकेटमध्ये विजेतेपद

अहमदाबाद येथे झालेल्या रिलायन्स जी-1 सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांना विजेतेपद. अंतिम लढतीत यजमान गुजरातवर 44 धावांनी मात

सत्तरी तालुका सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे स्वच्छता मोहीम

रेडीघाटी येथे सरकारी कर्मचारी संघटना, सत्तरी यांच्या तर्फे 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यकारिणी संदस्य चंद्रु सावंत, सत्तरी तालुका अध्यक्ष रुपेश गावस व इतरांची उपस्थिती.

साकोर्डाला चक्रीवादळाचा तडाखा; झाडांची पडझड, घरांचे छप्पर उडाले

साकोर्डा पंचायत क्षेत्रातील बट्टर तसेच इतर गावातील घरांना काल दि.१ ऑक्टोबर रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान. अनेक ठिकाणी झाडांची पडझड. घरातील पत्रे गेले उडुन छप्परचे नुकसान.

रस्त्यावर पडली झाडे. वाहतूक ठप्प. अग्निशामक दलांनी रस्त्यावरील झाडे हटवुन रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.

सांताक्रूझ येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस तपास सुरु

सांताक्रूझ मानस फोर पिलर येथे आज (बुधवारी) सकाळी मृतदेह सापडला. हा मृतदेह अद्याप ओळख पटलेली नाहीये असं पोलिसांनी सांगितले. मृतदेह पुढील तपासासाठी जीएमसी मध्ये पाठविला आहे.

बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, १२० किलो मांस जप्त

बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाच्या तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी केरी तपासणी नाक्यावर बेळागावातून गोव्यात येणाऱ्या बेकायदेशीर मांसावर कारवाई करत, तब्बल १२० किलो मांसासह कार जप्त केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.