Pune Crime: बाणेरमधील भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न
esakal October 03, 2024 06:45 AM

Pune Crime News: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाणेरमधील एका बिल्डरने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. बिल्डर रहिवाशांना मारहाण करण्याच्या पूर्ण तयारीत आला होता. त्याच्या गाडीमध्ये बेसबॉल स्टिक, बॅट इत्यादी साहित्य देखील होते.

बिल्डर आणि सोसायटीमधील रहिवाशी यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता हे समजू शकलेलं नाही. पण, बिल्डरची गुंडगिरी यातून दिसून आली आहे. बिल्डर अत्यंत घाणेरड्या भाषेत रविवाशांनी बोलतो. तसेच तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ते करा, अशी धमकी देखील तो देत आहे.

पत्रकार सौरभ कोरटकर यांनी सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर..एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो.

पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Pune Crime: दोघांनी अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेलं; एकाने लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने वहिनी म्हणून विनयभंग

ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती, असं ते म्हणाले आहेत.

Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या

तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सौरभ कोरटकर यांनी पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील, पुणे पोलिसांना देखील टॅग केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहावं लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.