तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, कामगार काम करत असतानाच आगडोंब उसळला, भिवंडीतील घटना 
अनिल वर्मा, एबीपी माझा October 03, 2024 09:43 AM

Bhivandi Fire: बॉयलरमधून झालेल्या तेलगळतीमुळे कामगार काम करत असलेल्या कापड डाईंग कंपनीत बुधवारी रात्री दोनच्या सुमारास मोठा स्फोट झाला. भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंगमध्ये ही घटना घडली. कच्च्या कपड्यापासून तयार कपडा बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना लागलेल्या या भीषण आगीमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ भिवंडी अग्निशामन दलाला पाचारण केले होते. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तातडीने दाखल झाली आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

नक्की काय झाले?

भिवंडी शहरातील बालाजी नगर परिसरामधील तपस्या डाईंग कंपनीला रात्री दोनच्या सुमारास तेल गळतीमुळे आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार तेलाचे लिकेज झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या कपड्या पासून तयार कपडा बनवण्याची प्रक्रिया चालू असताना बॉयलर मधून झालेल्या तेल गळतीमुळे कंपनीत मोठा स्फोट झाला. काही कळायच्या आत आग फोफावत गेली. यावेळी काही कामगार या डाईंग कंपनीमध्ये काम करत होते. आग लागल्याचे कळताच परिसरात मोठा गोंधळ उडाला. यानंतर स्थानिकांनी तात्काळ या कंपनीतून कामगारांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून आगीवर पूर्णपणे नियंत्रण आल्याचे सांगण्यात येत आहे. 

कंपनी जळून खाक

कंपनीत रात्री २ वाजता स्फोट झाल्याने आग फोफावली व संपर्ण कंपनीत आगीने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतू कंपनी जळून खाक झाल्याचे दृश्य आहे. कंपनीतील सामानाला आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना घडली त्यावेळी काही कामगार कंपनीत काम करत होते. त्यांना स्थानिकांनी बाहेर काढले आहे.

गेट तोडून स्थानिकांनी कामगारांना काढले बाहेर 

या कंपनीतून फोटो झाल्याचा आवाज आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या कंपनीला आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गेट तोडून आतील कामगारांना बाहेर काढले व अग्निशमन दलाला पाचारण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता अग्निशमन दल घटनास्थळी आल्याने आग नियंत्रणात  असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही वृत्त आहे.

जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.