Ahmednagar MVA Politics : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी 'या' जागांसाठी शरद पवारांची घेतली पुण्यात भेट!
Sarkarnama October 03, 2024 06:45 AM

Ahmednagar Vidhansabha Eelction 2024 : महायुती असो व महाविकास आघाडी, त्यातील सर्वच घटक पक्षांची पक्षश्रेष्ठींकडे विधानसभा मतदारसंघांच्या जागांसाठी गाठीभेटी सुरू आहेत. नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ दोन जागांसाठी देखील, अशाच पद्धतीने महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालत आहेत.

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पुण्यात एकत्र आले. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन नगर व श्रीगोंदा मतदारसंघाच्या जागेची मागणी केली. या भेटीत नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत बरचं काही शरद पवार बोलून गेले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात बरीच राजकीय उलथापालथ होईल, असं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने नगर जिल्ह्यातील आठ जागांवर दावा केला आहे. काँग्रेसने सात जागांवर दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाच जागांसाठी इच्छुक आहे. महाविकास आघाडीबरोबर असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघावर दावा केला आहे.

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi: 'ही' गोष्ट ठरणार 'मविआ'साठी वरदान तर महायुतीसाठी अवघड जागेचं दुखणं..?

महायुतीत भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या जागांवर दावा करत असले, तरी किती जागा लढवणार हे सांगत नाहीत. सत्ताधारी असल्याने, महायुतीमधील आमदरांनी त्यांच्या मतदारसंघात तळ ठोकून निवडणुकीच्या कामाला सुरवात केली आहे. महायुतीमधील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया रामदास आठवले पक्षाने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठेवून आहे. या जागेसाठी पक्षाने थेट महायुतीला चॅलेंज केलं आहे.

महाविकास आघाडी(MVA)मधील स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची महाविकास आघाडीचे स्थानिक नेते भेट घेत आहे. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र जाऊन भेटत असल्याने नेत्यांची देखील कोंडी होते. काँग्रेसचे नगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे घनश्याम शेलार, हेमंत ओगले, प्रशांत दरेकर यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे देखील तिथं उपस्थित होते. या शिष्टमंडळांशी त्यांनी देखील संवाद साधला.

Ahmednagar Politics : अजितदादांची रणरागिनी थांबेना; नागवडेंच्या तयारीने भाजपच्या खेम्यात अस्वस्थता? गाडे, शेलार यांच्यासाठी 'फिल्डिंग' -

काँग्रेस(Congress) आणि शिवसेना ठाकरे पक्षाने नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शिवसेना ठाकरे पक्षाकडून नगर शहरात शशिकांत गाडे, तर श्रीगोंद्यात काँग्रेसकडून घनश्याम शेलार इच्छुक आहेत, असे सांगण्यात आले. नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देणार असल्याचे शरद पवार यांनी या बैठकीत संकेत दिल्याचे या पदाधिकाऱ्यांनी भेटीविषयी सांगितले. शिवसेना ठाकरे पक्षाचे नगर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.